मुंबई : अनेकदा तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक ब्रेकफास्ट तसाच सोडून बाहेर पडतात. काही लोकांना सकाळी खाणं पसंत नसतं तर, काही लोक ऑफिसला उशीर होईल म्हणून काही खात नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, सकाळचा ब्रेकफास्ट करणे किती महत्वाचे आहे, हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळेच आज आम्ही अशांना सकाळच्या ब्रेकफास्टचे काय फायदे आहेत, हे सांगणार आहोत. 


- जे लोक सकाळी व्यवस्थित ब्रेकफास्ट करत नाहीत, ते लोक तासे करून त्यांच्या स्वत:च्या शरिराला खूप नुकसान पोहचवतात. सकाळी तुम्हाला भूक असो वा नसो ब्रेकफास्ट केलाच पाहिजे. सकाळी केलेल्या ब्रेकफास्टमुळे तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता. 
 
- सकाळी ब्रेकफास्ट केल्याने तुमच्या हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. यामुळे तुमचं आयुष्यही वाढतं. 


- एका रिसर्चमध्ये म्हटलं गेलंय की, जे लोक दररोज ब्रेकफास्ट करत नाहीत, त्यांचं वजन अधिक वाढण्याची शक्यता असते. 


- रात्रीच्या जेवणानंतर सकाळी ब्रेकफास्टपर्यंतचं अंतर खूप जास्त असतं. अशात शरिराला एनर्जी देण्यासाठी आणि अधिक एनर्जेटीक राहण्यासाठी ब्रेकफास्ट अत्यंत आवश्यक आहे. 


- ९० टक्क्यांपैकी प्रत्येक दुसरा व्यक्ती हा डायबेटिजने ग्रस्त आहे. हे त्यांना जास्त वजन आणि व्यायाम न करण्याने भोगावं लागतं. रिसर्चमधून हेही समोर आलं आहे की, रोज ब्रेकफास्ट न केल्याने महिलांना डायबेटिज होण्याची शक्यता अधिक असते.


- दररोज ब्रेकफास्ट केल्याने सतत हार्टच्या त्रासापासून तुम्हाला सुटका मिळू शकते. 


- सकाळी ब्रेकफास्ट करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे याने तुमची मेमरीही वाढते.