मुंबई : उन्हाळा सुरू झालाय. उन्हामुळे शरीराची लाही लाही होत असेल. अशावेळी थंड पेय पिण्याच्या मोह काही आवरता येत नाही. पण कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि इतर कोर्बाहार्ड्रेड पेयांपेक्षा नारळपाणी पिणे अत्यंत फायदेशीर ठरले. पहा काय आहेत नारळपाण्याचे फायदे...


डिहायट्रेशन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारळाचे पाणी कार्बोहायड्रेटचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पोटाच्या इतर समस्या दूर होण्यास मदत होते. नारळपाण्यात लिंबाचा रस घालून प्यायल्यास शरीरातील पाण्याची कमतरता भरुन निघते.


वजन कमी करण्यास मदत


सकाळी व्यायामानंतर नारळपाणी पिणे लाभदायी ठरते. नारळपाण्यात कमी प्रमाणात कॅलरीज असतात. नारळपाण्यात अनेक प्रकारचे बोयोअॅक्टीव्ह एन्जाईम्स असतात. नारळपाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते. त्यामुळे भूक कमी लागते. परिणामी तुम्ही कमी खाता.


उच्च रक्तदाबावर गुणकारी


नारळपाण्याचा उपयोग उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास होतो. यात असलेल्या व्हिटॉमिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.


डोकेदुखीवर आराम


शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स आणि पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी नारळपाणी फायदेशीर ठरते. डोकेदुखी असणाऱ्यांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होते. नारळपाण्याने ती कमतरता भरुन काढली जाते. परिणामी डोकेदुखीवर आराम मिळतो.


हॅंगओव्हरवर लाभदायी


हॅंगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी नारळपाणी लाभदायी आहे. यातील इलेक्ट्रोलाईट्समुळे शरीराला ऊर्जा मिळेत. त्यामुळे थकवा दूर होऊन ताजेतवाने वाटते.