अंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत
anjeer benefits in Marathi : तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवं असेल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. याशिवाय अंजीरचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र अंजीर खाण्याची योग्य वेळ देखील तुम्हाला माहित पाहिजे.
Health Tips In Marathi : सुकामेवा आरोग्यसाठी खूप चांगला असतो, अशा अनेकजण सल्ला देत असतात. जसे की काजू, बदाम, पिस्ता, अंजीर यासारखा सुकामेव्यांचा आहारात समावेश असणं निरोगी आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. पण जरदाळू किंवा अंजीर यांसारखा सुकामेवा आपरण खातोच असे नाही. महाग असल्याने हे जास्त आणलेही जात नाहीत. पण ड्राय अंजीर खाण्याचे आरोग्याला खूपच फायदेशीर ठरतात. त्यामुळे ते आवर्जुन खायला हवे. अंजीरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नीज, फायबर, ब 6 जीवनसत्व, ओमेगो 3 फॅटी अॅसिड हे घटक भरपूर प्रमाणात असतात. अंजीर खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच त्याची योग्य वेळ देखील असते. जाणून घ्या अंजीर कधी आणि कसे खावेत?
प्रतिकारशक्ती वाढते
अंजीरचे सेवन केल्याने व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट हे घटक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. शरीर सुदृढ राहण्यास मदत करते. व्हिटॅमिन अ, क, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम
रक्त शुद्धीकरण
शरीरातून हानीकारक घटक गुदद्वारातून बाहेर काढून टाकणे. रक्त पातळ करणे , रक्ताची वाढ करण्याचे काम अंजीर करते. रक्तदाब बद्दकोष्ठता आणि पचनाचे सगळे आजार दूर करण्यासाठी फारच फायदेशीर आहेत.
फायबरचा उत्तम साठा
शरीरात फायबरचे प्रमाण योग्य असेल तर अरबटचरबट खाण्याती फारशी इच्छा होत नाही. शरीरात चांगल्या बॅक्टेरियाला ठेवण्याल मदत करते.
उर्जेचा साठा
नैसर्गिक गोड आणि फॅट फ्री फळ असते. मोठ्या प्रमाणाक नैसर्गिक साखर, मिनरल्स आणि सोल्युबल फायबर असते. अंजीरमध्ये साधारण 200 कॅलरीज असतात शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते.
पचनशक्ती वाढवते
अंजीरचा उपयोग हा पोट साफ करण्यासाठी आणि पचनशक्ती चांगली करण्यासाठी केला जातो. फायबर असल्यामुळे ते पोटातील मल बाहेर टाकण्यात येणारा अडथळा दूर करते. पोटाचे कार्य सुरळीत करण्यासाठी अंजीरचे सेवन करावे.
ह्रदयासाठी चांगले
ह्रदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिड असते. रक्तामध्ये आढळणाऱ्या ग्लायएसेराईड नावाच्या घटकाला कमी करत आरोग्या चांगले राखते.
दम्यावर फायदेशीर
दम्यावरही अंजीर फायदेशीर आहे. रोज सकाळी एक तोळा अंजीर आणि लालसर पंढरी गोरख चिंच संपनत खा. त्यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि दम्याचा त्रास कमी होतो.
श्वेतकोडापासून ठेवते दूर
त्वचेच्या विकारांवर अंजीर चांगले काम करते. अंजीराचे नियमित सेवन कुष्ठरोगात फायदेशीर ठरते.
दिवसातून किती अंजीर खावे?
वजन वाढवण्यासाठी 4 ते 5 वेळा तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 2 ते 3 वेळा खावे.
अंजीर खाण्याचे दुष्परिणाम
अति सेवन केले तर जुलाब होण्याती शक्यता असते.
अंजीर खाण्याची योग्य वेळ
उपाशी पोटी इतर कोणत्याही ड्रायफ्रूटसोबत अंजीरचे सेवन करावे. सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री जेवणानंतर खावे, अशी माहिती युट्यूबवरील 'मेजर टिप्स मराठी' या पेजवर देण्यात आली आहे.