मुंबई : वांग सर्वांनाच आवडतं असं नाही. पण अशीही काही लोक आहेत त्यांना वांग फार आवडतं. वांग खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. वांग खाण्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहिती नसतील...


वजन कमी करण्यासाठी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांसाठी वांग खाणे अतिशय फायदेशीर ठरेल. वांग्यात खूप कमी कॅलरीज असतात. १०० ग्रॅम वांग्यातून तुम्हाला फक्त २५ कॅलरीज मिळतात. यात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. तसंच थोडसं वांग खाल्याने पोट भरतं आणि ओव्हर इटिंग टाळलं जातं.


हृदयाचे आरोग्य


वांग्यात भरपूर प्रमाणात फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॉमिन बी ६ आणि फ्लेवोनॉइड्स असतात. त्यामुळे हृद्यविकारांचा धोका कमी होतो. याशिवाय यातील अॅंटीऑक्सीडेंट्स नसा स्वस्थ ठेवतात आणि हार्ट अॅटकपासून दूर ठेवतात. 


हेल्दी लिव्हर


वांग्यातील फायबर्समुळे लिव्हर हेल्दी राहण्यास मदत होते. वांग्याच्या सेवनामुळे ब्लड कोलेस्ट्रॉलला पित्त बनवण्यासाठी लिव्हरला मदत होते.


ब्लड शुगर नियंत्रित राहण्यासाठी


मधुमेहींसाठी वांगाचे सेवन उपयुक्त ठरते. कारण यात कार्बोहायड्रेट कमी आणि फायबर्स अधिक असतात. फायबर्सचे अधिक प्रमाण ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.


कॅन्सरपासून बचाव


वांग्यात फायबर्स आणि अॅंटीऑक्सीडेंट्स असतात. त्यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो. फायबर्समुळे पचनतंत्र सुधारते आणि शरीरातील टॉक्सिन्स दूर होण्यास मदत होते. टॉक्सिन्समुळे कोलेन कॅन्सरचा धोका असतो. याशिवाय वांग्यातील अॅंटीऑक्सीडेंट्समुळे फ्रि रेडिकल डॅमेजशी लढण्यास पेशींना मदत होते.