मुंबई : आजकाल धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला काहीना काही त्रास, दुखणं सतावत असते. दिवसभर कम्युटर, लॅपटॉपसमोर बसल्याने, चूकीच्या पद्धतीने आहारात पदार्थांचा समावेश केल्याने, अपुर्‍या झोपेमुळे कंबरेचे, पायाचे दुखणे वाढते. तुमच्या आहाराकडे थोडं लक्ष दिल्यास अनेक दुखण्यांपासून आराम मिळू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल लहानमोठी दुखणी आबालवृद्धांमध्ये आढळतात. मग अशा दुखण्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात अंजीरचा समावेश करणं फायदेशीर आहे. प्रामुख्यने सुके अंजीर खाल्ल्यास ते आरोग्याला फायदेशीर आहे. 


फायदेशीर अंजीर 


अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक सुक्या अंजीरमध्ये मुबलक प्रमाणात असतात. अंजीरमध्ये पाणी 80%, कॅल्शियम घटक 0.06%, कार्बोहायड्रेट 63%, फायबर 2.3%, प्रोटीन 3.5%, क्षार 0.7%, सोडियम, पोटॅशियम, तांब, सल्फर आणि क्लोरिन घटकही मुबलक प्रमाणात असतात. 


अंजीरचे फायदे - 


सुक्या अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. गुडघ्याचं दुखणं कमी करण्यासाठी सुके अंजीर फायदेशीर आहे. दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी नियमित 3-4 अंजीर फायदेशीर आहेत.  


तुम्हांला कंबरेचे दुखणं असल्यास अंजीर, सुंठ आणि धणे समप्रमाणात मिसळून बारीक कुटून खावे. रात्री हे मिश्रण पाण्यात मिसळावे. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्यावे. नियमित हे मिश्रण प्यायल्यास त्रास कमी होण्यास मदत होते.