चणे - गूळ खाण्याचे काही अमेझिंग फायदे
अवेळी भूक लागल्यावर किंवा सकाळी नाश्ता करायला वेळ नसतो तेव्हा वेफर्स, जंकफूड, वडापाव, फ्रॅन्की असे काही जंकफूडचे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल असतो.
मुंबई : अवेळी भूक लागल्यावर किंवा सकाळी नाश्ता करायला वेळ नसतो तेव्हा वेफर्स, जंकफूड, वडापाव, फ्रॅन्की असे काही जंकफूडचे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल असतो.
अवेळी लागणार्या भूकेची वेळीच काळजी न घेतल्याने आणि काही अरबट चरबट पदार्थांची निवड केली जाते. यामुळे लठ्ठपणा, मधूमेहाचा त्रास वाढतो. गूळ आणि चणे हे कॉम्बिनेशन अवेळी लागणार्या भूकेला आटोक्यात ठेवण्यासाठी मदत करते. मग जाणून या कॉम्बिनेशनचे काही फायदे
मसल्स मजबूत करतात
चणे आणि गूळ एकत्र खाल्ल्याने मसल्स मजबूत होण्यास मदत होते. चणे आणि गूळातील प्रोटीन घटक नैसर्गिकरित्या आणि आरोग्यदायी मार्गाने तुमचे मसल्स बनवण्यासाठी मदत करतात.
त्वचेला कांती
त्वचेला चकाकी आणण्यासाठी आहारात झिंक घटक असलेले पदार्थ अवश्य निवडा. गूळ आणि चण्यामध्ये झिंक घटक असल्याने त्वचेला तजेला देण्यास मदत करतात.
लठ्ठपणा कमी होतो
गूळ आणि चणे एकत्र खाल्ल्याने शरीरात मेटॅबॉलिजमचा रेट सुधारतो. यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते. व्यायमशाळेत जाऊन वजन घटवण्यासाठी मेहनत करण्यासोबत आहरात चणे-गूळ हे मिश्रण एकत्र खावे.
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो
चणे आणि गूळ यामधील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. अॅसिडीटीचा त्रास कमी होतो.
मेंदुला चालना
गूळ आणि चणं हे मिश्रण मेंदूला चालना देण्यासाठी मदत करते. यामधील व्हिटॅमिन बी 6 घटक स्मरणशक्ती सुधारायला मदत करते.
दातांना मजबूत करतात
चणे-गूळ यामधील फॉस्फरस घटक दातांना अधिक मजबुती देतात. या मिश्रणाच्या सेवनाने दात मजबूत होतात आणि ते तुटण्याची शक्यता कमी होते.
हृद्याचे आरोग्य सुधारते
हृद्यविकार असणार्यांमध्ये चणे गूळ हा नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. यामधील पोटॅशियम घटक फायदेशीर ठरतात.