लिची खाण्याचे `6` आरोग्यदायी फायदे
उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास होतो.
मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास होतो. अशावेळेस मुबलक पाण्यासोबतच आहारात फळभाज्या, फळांचाही योग्य प्रमाणात वापर करणं गरजेचे आहे.
कलिंगड, टरबूज, ताडगोळा, शहाळ्याचं पाणी यासोबतच लिची खाणंही आरोग्यवर्धक आहे. लीची हे पाणीदार फळ आहे. सोबतच त्याला एक मंद सुगंध असल्याने उन्हाळ्यात लिची खाणं आरोग्यवर्धक आहे.
लिचीमध्ये आरोग्यदायी घटक -
लिची या फळामध्ये कार्बोहायड्रेट्स,व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न घटक मुबलक प्रमाणात असतात. लिचीमध्ये नैसर्गिकरित्या गोडवा असल्याने तात्काळ एनर्जी मिळण्यास मदत होते. लिचीमुळे पोटात थंडावा निर्माण होतो.
तात्काळ मिळते उर्जा -
उन्हाळ्याच्या दिवसात थकवा येतो. अशावेळेस लिचीच्या सेवनामुळे त्यामधील नियासिन घटक शरीरातील हिमोग्लोबिन घटक निर्माण करण्यास मदत करतात. यामुळे शरीराला तात्काळ उर्जा मिळते.
कॅन्सरशी सामना -
लीचीमधील किमोप्रोटेक्टिव घटक ब्रेस्ट कॅन्सर सेल्स आणि ट्युमर यांची निर्मिती होण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. सोबतच लीची मधील फ्लेवोनॉईड्स आणि अॅन्टीऑक्सिडंट घटक कॅन्सरचा बचाव करण्यास मदत करतात.
वजन घटवण्यास मदत
वजन घटवणार्यांसाठी लीची हे फळं फायदेशीर ठरतं. कपभर लीचीच्या अर्कामध्ये 125 कॅलरीज असतात. यामध्ये फॅट्स कमी असतात. फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रणात राहतो
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक असणारे पोटॅशियम घटक लिचीमध्ये मुबलक प्रमाणात असतात. कपभर लीचीमध्ये 325 ग्राम पोटॅशियम घटक आढळतात. यामुळे दिवसभरातील 9% गरज पूर्ण होण्यास मदत होते.
रोगप्रतिकारक्षमता सुधारते
शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास लिची हे फळ मदत करते. कपभर लीचीमध्ये सुमारे 136 मिली ग्राम व्हिटॅमिन सी घटक आढळतात. नियमित लिचीच्या सेवनामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
सौंदर्य खुलवते
चेहर्यावर पिंपल्सचे डाग असतील त्वचा खुलवण्यासाठी लिची खाणं आरोग्यदायी ठरते. लिचीमध्ये अॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे अॅन्टी एजिंगचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.