मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत नाश्तासाठी झटपट बनणारे ओट्स खाण्यास प्राधान्य दिले जात आहे. पण हा खरंच एक हेल्दी पर्याय आहे. त्यामुळे आरोग्यास अनेक फायदे होतात. पाहुया ओट्स खाण्याचे काही जबरदस्त फायदे...


उच्च रक्तदाब नियंत्रित


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांसाठी ओट्सचे सेवन अतिशय फायदेशीर ठरते. नियमित ओट्सचे सेवन केल्याने रक्तदाबाची समस्या उद्भवण्यास आळा घालतो. यातील फायबरमुळे उच्च रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत करतो.


मधुमेधावर गुणकारी


मधुमेह असणाऱ्यांसाठी ओट्सचे सेवन अतिशय गुणकारी ठरते. नाश्त्याला ओट्स खाल्याने लवकर भूक लागत नाही. त्याचबरोबर पोट साफ राहण्यास मदत होते. 


हृदयरोगासाठी फायदेशीर


रोज ओट्स खाल्याने हृदयासंबंधित समस्या होण्याचा धोका कमी होतो. ओट्समध्ये असलेले बीट ग्लूकेन फायबरमुळे ब्लड कोलेस्ट्रॉलची पातळी सुरळीत राहते. 


बद्धकोष्ठतेपासून सूटका


ओट्स खाल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होते. यातील फायबर्समुळे पचनशक्ती वाढते व बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. ओट्समध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॉमिन बी कॉम्प्लेक्स आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे नर्व्हस सिस्टम तंदुरुस्त राहते.


चमकदार त्वचा


ओट्सचे सेवन त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते. त्वचा कोरडी असल्यास किंवा खाज, जळजळ यांसारख्या त्वचेच्या समस्या असल्यास ओट्स उपयुक्त ठरतात. त्यासाठी चमचाभर ओट्स घ्या. त्यात कच्चे दूध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा व हाता-पायांवर लावा. त्वचा चमकदार होईल.


वजन कमी करण्यास 


वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ओट्सचे सेवन फायदेशीर ठरेल. यात लो कोलेस्ट्रॉल आणि कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ओट्समुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात.


तणाव कमी करण्यास


ओट्समध्ये फायबर आणि मॅग्नेशियम असते. त्यामुळे मेंदूत सेरोटोनिनचे प्रमाण वाढते. ओट्स खाल्याने डोके शांत राहते. ओट्सच्या सेवनाने चांगली झोपही लागते. यात ब्लूबेरी घालून खाल्यास अतिशय फायदा होतो. यात अॅंटीऑक्सीडेंट आणि व्हिटॉमिन सी असते. त्यामुळे तणावाचा सामना करण्यास मदत होते.