मुंबई : पाणीपुरीचं फक्त नाव घेतलं तरीही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. चटपटीत, आंबट, गोड,तिखट चवीची पाणीपुरी अनेकांसाठी मूड सेट करायला मदत करते.  पण केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही पाणीपुरी खाणं फायदेशीर आहे. बाजारात मिळणारी पाणीपुरी आणि स्वच्छता हा वादाचा मुद्दा असतो. म्हणूनच घरच्या घरी आणि झटपट तयार होणारी पाणीपुरी या फायद्यांसाठी बिनधास्त चाखायला हवी.  


तोंड येणं - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अति तिखट किंवा गरम पदार्थ खाल्ल्याने तोंड  येण्याचा त्रास जाणवतो. मात्र अशावेळेस पाणीपुरीचा आस्वाद घेतल्यास तोंड येण्याचा येण्याच्या समस्येवर तात्काळ आराम मिळण्यास सुरूवात होते.  


पोटाचा त्रास - 


चूकीच्या किंवा अति खाल्ल्याने पोट जड वाटणं, पचनाचा त्रास जाणवणं हा त्रास तुम्हांला होत असेल तर पाणीपुरीचा आस्वाद घ्या. पाणीपुरीच्या तिखट पाण्यामध्ये पुदीना, काळं मीठ, जीरं यांचा समावेश केलेला असतो. हे पदार्थ पाचक असल्याने पचनाचा सौम्य स्वरूपातील त्रास दूर होण्यास मदत होते.  वाटाण्याऐवजी मूगाचा वापर करणं अधिक आरोग्यदायी आहे. घरच्या घरी बनवलेलं पाणीपुरीचं तिखट पाणी केवळ पिणंदेखील अपचनाचा त्रास दूर करण्यास फायदेशीर आहे. 


चिडचिड - 


उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा मूड स्विंग्समुळे होणारी चिडचिड कमी करण्यासाठी पाणीपुरी हा उत्तम पर्याय आहे. मिश्र चवीची पाणीपुरी तुमचा मूड सुधारायला मदत करते. 


किती आणि कधी खावी पाणीपुरी ?  


संध्याकाळच्या वेळेस पाणीपुरीचा आस्वाद घेणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. एका वेळेस 5-6 पाणीपुरी खाणं आरोग्याच्यादृष्टीने सुरक्षित आहे. जेवणापूर्वी  10-15 मिनिटं पाणीपुरी खाणं आरोग्यदायी आहे. मात्र वर्क आऊट पूर्वी आणि नंतर शक्यतो पाणीपुरी खाणं टाळा.