मुंबई : स्थानिक अन्न खावे, असा सल्ला सेलिब्रेटी न्युट्रीशियनिस्ट ऋतुजा दिवेकर मुंबई नेहमी देत असते. पण परदेशी पदार्थांची आपल्यावर इतकी भूरळ पडली आहे की, आपल्या मातीत पिकणारे, पौष्टीक पदार्थांकडे आपले दुर्लक्ष होत आहे. अनेकदा तर आपल्याला त्याचे महत्त्वच ठाऊक नसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुईमुगाच्या शेंगा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. त्या चवीलाही उत्तम असतात. उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे ५ जबरदस्त फायदे...


हृदयविकार


यातील इसेंशियल फॅटी अॅसिड्स आणि अनेक अॅंटी ऑक्सिडेंट्स हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.


मधूमेह


पायदुखीवर आराम मिळण्यासाठी उकडलेल्या शेंगा खाणे फायदेशीर ठरते. त्याचबरोबर मिनरल्स आणि व्हिटॉमिन बी याच्या भरपूर प्रमाणामुळे शरीराचा स्टिफनेस कमी होतो आणि ब्लड शुगर नियंत्रित होते.


पीसीओडी


यात बायोटिन, व्हिटॉमिन बी१ आणि बी६ असतं. यामुळे पोट फुगण्याच्या समस्येवर आराम मिळतो. पीएसएस, पिंपल्स आणि केसगळती यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.


प्रेग्नेंसी


गर्भवती महिलांनी नियमित भुईमुगाच्या शेंगा खाल्यास अनेक फायदे होतात. गुड बॅक्टेरीयाचे संतुलन ठेवण्यासाठी, गर्भातील बाळाला इंफेक्शनपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अॅलर्जीपासून दूर ठेवण्यासाठी भुईमुगाच्या शेंगा उपयुक्त ठरतात. 


टीनएजर्स


प्रोटीन आणि मायक्रोन्युट्रिएंट्सने भरपूर भुईमुगाच्या शेंगा किशोरवस्थेतील मुलांसाठी एक उत्तम नाश्ता आहे. यामुळे मूड चांगला राहतो. हलकी भूक लागल्यास शेंगा खाणे हा नाश्त्याचा एक हेल्दी पर्याय आहे.