भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास गर्भवती महिलांना होतो फायदा, जाणून घ्या
जाणून घ्या अक्रोड खाण्याचे फायदे
मुंबई : अक्रोड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अक्रोडला एनर्जीचं पॉवरहाऊस म्हणतात. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन, फॉस्फरस आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. पण अक्रोड भिजवून त्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. कच्च्या अक्रोडांपेक्षा भिजवलेले अक्रोड जास्त फायदेशीर आहे. याशिवाय रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन केल्याने अनेक आजार दूर होतात. तसेच, गर्भवती महिलांसाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे. भिजवलेल्या अक्रोडाचे फायदे: भिजवलेल्या अक्रोडात अनेक रहस्ये दडलेली आहेत, गर्भवती महिलांसाठी ते फायदेशीर आहे.
गर्भवती महिलांसाठी भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे
भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात आढळते. ओमेगा- 3 फॅटी अॅसिड्स न जन्मलेल्या बाळाच्या मेंदूच्या विकासात मदत करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने अक्रोडाचे सेवन करणे आई आणि न जन्मलेले बाळ दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकते.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर
हृदय निरोगी ठेवण्यासाठी भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते, जे हृदयासाठी फायदेशीर असते. ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गूड कोलेस्ट्रॉल तयार करण्यास मदत करतात, जे हृदयासाठी फायदेशीर आहे.
पचन सुधारण्यासाठी फायदेशीर
भिजवलेले अक्रोड खाणे पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण अक्रोडमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते, जे योग्य पचन राखण्यास मदत करते. तसेच याचे रोज सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल आणि पोटही बरोबर राहील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)