मुंबई : अनेकदा शिळं अन्न खाऊ नका असा सल्ला दिला जातो. अन्न शिळं झालं तर ते पुन्हा पुन्हा खाण्यापेक्षा फेकून देणं पसंत करतात. मात्र भात याला थोड्या प्रमाणात अपवाद आहे. शिळा भात आरोग्याला फायदेशीरही ठरू शकतो. रात्रीचा भात सकाळी खाल्ल्याने काही समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत होते. 


 कसा ठरतो भात फायदेशीर ?  


 रात्रीचा भात सकाळी खाल्ल्याने आरोग्याला त्याचा फायदा होऊ शकतो. भात मूळात थंड प्रवृत्तीचा असल्याने सकाळी नाश्त्याला त्याचे सेवन करणं आरोग्याला फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिळ्या भातामध्ये मायक्रो - न्युट्रिएन्ट्स आणि मिनरल्स असतात.  
 
 1) पचनसंस्था तंदरूस्त राहते -  
 
 शिळा भात तुम्ही खात असाल तर यामुळे तुमची पचनसंस्था उत्तम राहण्यास मदत होते. शिळ्या भातातील पोषक घटक पचनसंस्थेचे कार्य सुधारायला मदत करतात. सोबतच शरीराचं तापमानही नियंत्रणात ठेवतात. 
 
 2) शरीराचं तापमान नियंत्रणात राहते -  
 
 शिळ्या भातामुळे शरीराचं तापामान नियंत्रणात राहण्यास मदत होते. तांदूळ थंड प्रकृतीचा असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. नाश्त्यामध्ये शिळ्या भाताचे विविध पदार्थ बनवून त्याचा आहारात समावेश करता येऊ शकतो. 
 
 3) कॅन्सरपासून बचाव - 
 
 शिळ्या भाताच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो. तांदूळ / भातामधील फॅट, कोलेस्टेरॉल, सोडियम घटक कॅन्सरशी लढण्यास शरीराला मदत करतात. ब्राऊन तांदळामधील कॅल्शियम घटक रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवते. 
 
 4) फायाबरचा उत्तम स्त्रोत 
 
 भातामध्ये फायबर घटकही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे भात शिळा किंवा ताजा असला तरीही त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, पोटदुखीसारखे त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. 
 
 5) माऊथ अल्सर - 
 
 माऊथ अल्सरचा त्रास असेल तर दोन्ही वेळेस जेवणात शिळा भात खावा. यामुळे माऊथ अल्सरचा त्रास आटोक्यात राहायला मदत होते.