हे आहेत हाताने जेवण्याचे फायदे!
हाताने जेवणे ही आपली भारतीय संस्कृती.
मुंबई : हाताने जेवणे ही आपली भारतीय संस्कृती. पण आपल्याकडे इंग्रजांचे राज्य आले आणि त्यांनी असे काही केले की आपल्यालाच आपल्या संस्कृतीचा लाज वाटू लागली. दीडशे वर्ष राज्य केलेल्या इंग्रजांचा आपल्या वरील प्रभाव इतका कायम आहे की आपल्याला अजूनही आपण त्यांची संस्कृती फॉलो करतो.
जेवण हे माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे कार्य करते. ते हाताने जेवावे ही आपली संस्कृती पण तुम्ही रेस्टारंट व्यतिरीक्त अनेक ठिकाणीही चमचा, काट्याने अन्न ग्रहण करता?
मग तुम्ही पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहात. तुम्हाला माहित आहेत का हाताने जेवण्याचे फायदे...? तर मग जाणून घ्या...
हाताच्या बोटांमध्ये असलेले जीवाणू अन्नपचनास मदत करतात.
टाईप २ चा मधुमेह रोखण्यास मदत होते.
तुम्ही हवा तेवढाचा घास हातात उचलता. त्याहुन अधिक तुम्ही खात नाही.
हाताने खाणे एक प्रकारचा व्यायाम आहे.
फक्त भारतातच नाही तर आफ्रिकी, मीडल ईस्ट प्रदेशातही हाताने जेवण्याची संस्कृती आहे.