मुंबई : प्रत्येक धर्मामध्ये सण त्याच्यासोबत येणारं देवाचं नातं अधिक मजबूत करण्यासाठी 'उपवास' करण्याचा सल्ला दिला जातो. पण उपवास हा केवळ धार्मिक कारणांपुरता मर्यादीत नसून त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देव, धर्म  मानत नसलात तरीही उपावास करणं तुम्हांला फायद्याचं ठरू शकतं. खरंतर 'एकादशी आणि दुप्पट खाशी' असं म्हटलं जातं. उपवास आहे या कल्पनेच आपण कळत नकळत अधिक खातो.  मग उपवासाचा बागलबुवा न करता आरोग्यदायी कारणासाठी तो कसा करावा? हे जाणून घेण्यासाठी हा सल्ला नक्की जाणून घ्या. 


उपवासाचे आरोग्यदायी फायदे -  


डीटॉक्सिफिकेशन – 


आयुर्वेदानुसारही अनेक आजारांचं मूळ हे शरीरात साचून राहणारे घातक/विषारी घटक हे आहे. त्यामुळे उपवास केल्याने पोटाला आराम मिळतो आणि घातक घटक  बाहेर पडण्यास मदत होते.


पचनसंस्थेचे कार्य सुधारते –


फळं आणि हलका आहार घेऊन उपवास केल्यास पचनकार्यालाही चालना मिळते. पचनसंस्थेवर आलेला दाब थोड्या प्रमाणात हलका करण्यास मदत होते. 


 मन शांत होते –  


वातावरणाचा,गुरूत्वाकर्षणाचा मानवी शरीरावर परिणाम होतो. त्यातूनच मूड स्विंग्स तयार होतात. मानसिक ताणतणाव वाढला की चिडचिड, मत्सर यासारख्या भावनाही वाढतात. उपवास केल्याने पोटात अ‍ॅसिड बिल्डअप वाढतो. त्यामुळे अनेक अनेक समस्यांवर नियंत्रण ठेवणं सुकर होते.


उर्जा मिळते – 


शरीर आणि मन डिटॉक्स झाल्यानंतर त्यामधून शरीरालाही उर्जा मिळते. अधिक प्रसन्न आणि रिफ्रेशिंग वाटते.


उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ?


उपवास करताना आहाराचं, व्यायामाचं आणि आरोग्याचं गणित सांभाळा. खूप थकवणारे व्यायाम, कामं टाळा. खूप तेलकट किंवा सतत खातं राहणं टाळा. त्याऐवजी राजगिरा थालिपीठ, फळं असा हलका आहार घ्या. यामुळे पचनकार्यावर भार येणार  नाही.  खाण्यासोबतच मुबलक पाणी किंवा  लस्सी, ताक यासारखे पेययुक्त पदार्थ आहारात ठेवा.