मुंबई : बडीशेप आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. बडीशेपमध्ये आयर्न, फायबर, कॅल्शियम हे घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे केवळ मुखशुद्धीसाठी नव्हे तर इतर अनेक आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी आहारात बडीशेपचा वापर करणं आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय अनेकांना असते. पण बडीशेप का खाल्ली जाते ठाऊक आहे का? पोट फुगणे किंवा पचनक्रीयेच्या समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी बडीशेप अत्यंत उपयुक्त असते.


# बडीशेप खाल्याने पोषकतत्वांचे शोषण शरीरात योग्यरीत्या होते. ब्लॉटिंगची समस्या दूर करण्यासाठी, गॅसेसपासून सुटका मिळवण्यासाठी बडीशेप अतिशय फायदेशीर ठरते. 


# बडीशेपमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर रक्तात कोलेस्ट्रॉलचा हेल्दी स्तर ठेवण्यासाठी मदत होते.


# बडीशेप पोटॅशियमचा एक समृद्ध स्त्रोत आहे. तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी मदत होते.