Breakfast Tips : नाष्टा हे दिवसातील सर्वात महत्त्वाचे जेवण असल्याचे म्हटलं जातं. सकाळचा नाष्टा आरोग्यदायी आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असेल तर आरोग्यही चांगले आणि निरोगी राहते. पण, अनेकांचा दिवस नाष्टा न करताच सुरू होतो. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक देखील नाष्टा टाळू लागतात कारण त्यांना वाटतं की नाष्टा  न केल्यानं शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल. पण, प्रत्यक्षात तसे होत नाही. नाष्टा न केल्याने शरीरावर कसा परिणाम होतो आणि रोज सकाळी नाश्ता करणं का महत्त्वाचं आहे ते जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन वाढू शकते
बर्‍याच अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की नाष्टा न केल्यानं शरीरावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे वजन वाढू शकतं. जे लोक नाष्टा करत नाहीत, ते दुपारच्या जेवणापर्यंत किंवा दुपारच्या जेवणातच जास्त चरबीयुक्त पदार्थ आणि साखरयुक्त पदार्थांचे सेवन करतात. यामुळे शरीरातील कॅलरी जास्त प्रमाणात वाढते. नाष्टा करताना असे होत नाही. म्हणूनच नाष्टा वगळल्यानं वजन वाढू शकते.


रक्तातील साखरेची पातळी घटते
जे लोक नाष्टा करत नाहीत त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी खूप कमी असू शकते. त्याच वेळी, अनेक अभ्यास असे सूचित करतात की नाष्टा न केल्यानं  टाइप 2 मधुमेह होतो. जे आधीच मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनी नाश्ता करण्यास विसरू नये.


ऊर्जा पातळी
दिवसभर खराब मूड आणि शरीरातील कमी ऊर्जा पातळी हा देखील नाष्टा न करण्याचा दुष्परिणाम आहे. लोकांना अशक्तपणा आणि चक्कर येण्यासारख्या समस्या देखील सुरू होतात. शाळेत जाणार्‍या मुलांना काही वेळ वर्गात उभे राहता येत नाही आणि काम करणार्‍या लोकांची नाष्टा न करता कार्यालयात दुरवस्था झाली आहे. नाष्टा न केल्यामुळे लागनारी भूक हे देखील चिडचिड होण्याचे कारण बनते.


प्रथिन्यांची कमतरता
नाष्टा न केल्यानं शरीरात प्रथिनांची कमतरता होऊ शकते. प्रथिनेयुक्त नाष्टा सहसा सकाळी केला जातो. जर तुम्ही नाष्टा केला नाही तर तुम्हाला हे प्रोटीन मिळत नाही, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊन केस गळतात. त्यामुळे नाष्टा करनं आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Z24 तास याची पुष्टी करत नाही.)