... म्हणून पावसाळ्यात सूप्सचा आस्वाद घ्यायलाच हवा
वातावरणामध्ये बदल झाला की आपला आहारदेखील बदलतो.
मुंबई : वातावरणामध्ये बदल झाला की आपला आहारदेखील बदलतो. पावसाळ्याच्या दिवसात आजारपण, साथीचे आजार झपाट्याने पसरतात त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी काही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अनेकजण आजरी पडल्यावर सूप्स घेतात, रात्रीच्या जेवणाऐवजी सूपची निवड करतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसात चहा आणि भजीप्रमाणेच गरमागरम सूप पिण्याचीही मज्जा काही और असते. मग या चांगल्या सवयीचा आरोग्यदायी फायदा तुम्हांला ठाऊक आहे का?
पावसाळ्यात सूप्स पिण्याचे आरोग्यदायी फायदे
आजारपण राहते दूर
पावसाळ्याच्या दिवसात सर्दी खोकल्याचा त्रास अनेकांना जाणवतो. नियमित सूप प्यायल्याने अशा आजारपणांना दूर ठेवण्यास मदत होते. गळ्यातील इंफेक्शन कमी करण्यासाठी सूपमध्ये काळामिरी पावडर मिसळा. ऋजुता दिवेकरच्या 'या' डाएट टीप्सने पावसाळ्यात रहा हेल्दी !
पचनशक्ती सुधारते
सूपमध्ये तुम्ही आजारपण टाळू शकता सोबतच तुमची पचनशक्तीदेखील मजबूत करू शकता. पावसाळ्याच्या दिवसात पचनशक्ती कमजोर होते. सूपमुळे पचनशक्ती सुधारते. पावसाळ्यात आजारपण दूर ठेवण्यासाठी या '5' पदार्थांपासून दूरच रहा
तात्काळ उर्जा मिळते
अनेकदा ढगाळ वातावरणामुळे मरगळ येते. शरीर थकते. अशावेळेस सूपच्या सेवनाने तात्काळ उर्जा मिळते.
शरीर हायड्रेटेड राहते
मान्सूनच्या दिवसात सतत वॉशरूमला जावं लागतं म्हणून अनेकजण पाणी कमी पितात. मात्र मंदावलेली पचनशक्ती आणि शरीरात डीहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून सूप पिणं फायदेशीर आहे. पचायला हलकं आणि आवडीनुसार झटपट तयार होईल असं सूप फायदेशीर आहे.
वजन ठेवा नियंत्रणात
वेट लॉसच्या मिशनवर असणार्यांना आहारात नेमके काय खावे? हा प्रश्न सतावत असतो. अशावेळेस शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमध्ये विविध सूप्सचा पर्याय निवडता येतो. फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीरात कॅलरीचं गणित सांभाळून उर्जा मिळण्यास मदत होते. सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे हे आहेत फायदे