मुंबई : खरंतर भारतीय अन्नपदार्थ अत्यंत पौष्टीक, आरोग्यदायी आणि चविष्ट आहेत. मात्र अनेकदा आपल्यालाच याची माहिती नसते. पराठे, डोसे, थालीपीठ हे पदार्थ रूचकर तर लागतातच पण हेल्दीही असतात. यात कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन यांच्यासह अन्य पोषक घटक असतात.  सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर सांगतेय भारतीय डाळींचे महत्त्व...


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    डाळी या पोषक घटकांनी परिपूर्ण असतात. त्यामुळे डाळीचा आहारात अवश्य समावेश करा. त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. वरण भात हा आपला भारतीय आहार अत्यंत हेल्दी आहे. त्याचबरोबर डाळ कचोरी, पुरणपोळी, इडली, डोसा हे पदार्थ देखील डाळीपासून बनलेले असतात. हे अत्यंत चविष्ट आणि आरोग्यदायी आहेत.

  • खरंतर भारतीय डाळी या सुपरफूड आहेत. डाळी या मिनिरल्सचा उत्तम आणि महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. लिव्हरस्टोन, पित्ताशयात होणारे खडे हे आजार टाळण्यासाठी डाळी महत्त्वाच्या ठरतात.

  • नायट्रोजनची कमी भरून काढण्यासाठी डाळी फायदेशीर ठरतात. पचनास हलके असल्याने आजारपणात मऊ भात-वरण, मुगाच्या डाळीची खिचडी उपयुक्त ठरते.

  • त्याचबरोबर सध्या डाळी खाणे ट्रेंडमध्ये आहे. त्याचे फायदे लक्षात घेऊन आपण दैनंदिन आहारात डाळींचा समावेश करायला हवा. 


नोट : भारतात ६५००० हुन अधिक प्रकारच्या डाळी उपलब्ध आहेत. मात्र आपण फक्त ६ प्रकारच्या डाळी खातो. त्यामुळे अधिकाधिक डाळींचा आहारात समावेश करा. त्यामुळे पोटाचे आरोग्य देखील सुधारेल.