जांभळाची बी कमी करेल या `4` समस्या
जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही.
मुंबई : जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जांभळाच्या बियांमध्ये अनेक हेल्दी कंपाऊंडस असतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो. म्हणून जांभूळ खाऊन बिया फेकून देण्यापूर्वी त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या.
१. मधुमेहावर नियंत्रण :
जांभळामध्ये अँटी डायबेटीक गुणधर्म असतात. त्यात असलेल्या alkaloids केमिकलमुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यास आळा बसतो आणि म्हणूनच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राखले जाते. जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर करा आणि दिवसातून तीनदा खा. मधुमेहावर हा अत्यंत चांगला उपाय आहे. दूध किंवा पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घ्या. त्यामुळे देखील मधुमेह नियंत्रित राहील. हा उपाय पारंपरिक असून अतिशय परिणामकारक आहे. त्यामुळे मधुमेहाचा शरीरावर होणारा दुष्परिणाम कमी होतो.
२. रक्तदाबाचा त्रास कमी होण्यास:
मधुमेहासोबतच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे. the Asian Specific Journal of Tropical Biomedicine च्या अभ्यासानुसार जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब ३४.६% नी कमी होतो. त्यात असलेल्या phenol antioxidant मध्ये रक्तदाब विरोधी गुणधर्म असतात. आवळ्याचा रस – रक्तदाब आटोक्यात ठेवणारा नैसर्गिक उपाय
३. शरीर डिटॉक्स करते:
जांभळात flavonoids भरपूर प्रमाणात असतात. हे अँटिऑक्सिडंट शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स बाहेर टाकण्यास मदत करतात. त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट एन्झाइम्स सुरक्षित ठेवतात. यामुळे जांभूळ डिटॉक्सिफिकेशन मध्ये मदत करते आणि इम्यून सिस्टिमचे कार्य सुरळीत करते. तसंच जांभळामध्ये अधिक प्रमाणात phenolic कंपाऊंडस असतात. ते अँटिऑक्सिडंट अॅक्टिव्हिटी उत्तमरीत्या पार पाडतात.
४. पोटांच्या विकारांवर उपयुक्त:
पचन संस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरतं. बियांचा अर्क जखम किंवा आतड्यातील अल्सर आणि genitourinary tract इन्फेकशन दूर करण्यास फायदेशीर आहे. जुलाब झाल्यास जांभळाच्या बियांची पावडर साखरेत मिसळून दिवसातून २-३ वेळा घ्या.