मुंबई : हिवाळ्याच्या दिवसात त्वचा शुष्क होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रामुख्याने त्वचेतील मॉईश्चर कमी होत असल्याने त्वचेला कंड सुटण्याची शक्यता असते. सोबतच पायाच्या तळव्याची त्वचा, पापुद्रे निघतात. सोबतच टाचांना भेगा पडण्याचीही शक्यता असते. 


हिवाळ्याच्या दिवसात त्वचेमध्ये मॉईश्चर टिकून रहावे असे वाटत असेल तर खोबरेल तेलाचा अवश्य वापर करा. खोबरेल तेलाच्या मसाजाने हिवाळ्यात पाय मुलायम ठेवण्यास मदत होते.  


नेमका फायदा काय ? 


हिवाळ्याच्या दिवसात खोबरेल तेल गरम करून मसाज करा. तेल  गरम केल्याने शरीरातील थंडी कमी होते, उष्णता वाढते. 
खोबरेल तेलाच्या मसाजामुळे शरीरातील, पायातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. सोबतच मॉईश्चर टिकून राहते. त्वचा शुष्क होण्याचा त्रास आटोक्यात राहतो. नियमित मसाज केल्याने पायांना भेगा पडण्याची समस्या कमी होते.  


मसाजाचे फायदे  


नियमित पायाला मसाज केल्याने पायाचे, त्वचेचे आरोग्य सुधारते सोबतच इतर काही समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. 


पायांमध्ये पाणी साचल्याने येणारी सूज आटोक्यात राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी पायांवर सूज असल्यास तज्ञांच्या मदतीने पायांना मसाज करावा.  


दिवसभराचा ताण हलका करण्यासाठी पायांना मसाज करणं हा रेफ्लेसोलॉजीतील एक उपाय आहे. 


मसाजमुळे पायातील स्नायूंवरील ताण हलका होतो सोबतच वेदनादेखील कमी होतात. 


रात्री झोपण्यापूर्वी मसाज केल्याने शांत झोप मिळते. निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहते.