मुंबई : पावसाळा कितीही अल्हाददायी वाटला तरी सोबतीला आजारपण घेऊनच येतो. त्यामुळे आजारपण, इंफेक्शन टाळावे म्हणून आपणच विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध उपाय आपल्याकडे आहेत. त्यातील एक म्हणजे पुदीना. पुदीन्याचे अनेक फायदे आपण जाणतो. पुदीन्याची चटणी तशी सर्वांच्याच आवडीची. पण तुम्ही पुदीन्याचा चहा कधी ट्राय केलाय का? तर जाणून घेऊया यामुळे होणारे फायदे आणि चहा करण्याची पद्धत...


पुदीन्याचा चहा घेतल्याने होणारे फायदे-


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

  • पचनतंत्र मजबूत होण्यास साहाय्यक ठरतो.

  • लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्यास उपयुक्त.

  • श्वासासंबंधित समस्यांवर आराम मिळतो.

  • फंगल इंफेक्शनला आळा बसतो.

  • ताण दूर करण्यास फायदेशीर.

  • पीसीओएस ची समस्या असणाऱ्या महिलांसाठी लाभदायी.

  • ऑस्टियोआर्थराइटिस कमी करण्यास मदत होते.

  • कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी.


पुदीन्याचा चहा नेमका कसा बनवावा...?


साहित्य


८-१० पुदीन्याची पाने
अर्धा छोटा चमचा काळीमिरी
अर्धा छोटा चमचा काळं मीठ
२ कप पाणी


कृती


पुदीन्याचा चहा बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळवून घ्या. त्यानंतर त्यात पुदीन्याची पाने, काळीमिरी आणि काळं मीठ घाला आणि ५ मिनिटे उकळवा. पुदीन्याचा चहा तयार. गाळून घ्या आणि प्या.