`या` फायद्यांसाठी सलाडमध्ये मुळ्याचा समावेश करा!
आरोग्यासाठी भाज्या-फळे फायदेशीर असतात, हे आपण सर्वच जाणतो.
नवी दिल्ली : आरोग्यासाठी भाज्या-फळे फायदेशीर असतात, हे आपण सर्वच जाणतो. आजकाल तर डाएटचे फॅड आहे आणि त्यात सलाड खाणे ट्रेंडमध्ये आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. त्यातील एक भाजी म्हणजे मुळा. अनेकांना त्याचा स्वाद आवडत नसल्याने मुळ्याचे नाव काढताच ते नाकं मुरडतात. पण मुळा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? आरोग्यासाठी फायदेशीर असण्याबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यातही मुळा महत्त्वाचे कार्य करतो. दैनंदिन आहारात मुळ्याचा समावेश केल्यास कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार दूर राहण्यास मदत होते.
जाणून घेऊया मुळा खाण्याचे फायदे...
मुळ्यात भरपूर प्रमाणात फॉलिक अॅसिड, व्हिटॉमिन सी आणि एंथोकाइनिन असल्याने शरीरात कॅन्सर प्रतिरोधक क्षमता वाढते.
मुळ्यात असलेल्या व्हिटॉमिनमुळे श्वासाचे काही त्रास कमी होण्यास मदत होते.
रोज सकाळी रिकाम्या पोटी मुळा खाल्याने मधूमेहसारखे आजार नियंत्रणात येतात. त्याचबरोबर काळीव सारखे आजार दूर राहण्यास मदत होते.
अपचन न झाल्यास मुळा खाणे फायदेशीर ठरेल. मुळ्याच्या कप रसात खडीसाखर घालून प्यायल्याने अपचन, करबट ढेकर यापासून मुक्तता मिळते.
जीवनशैलीमुळे खाण्यापिण्यात झालेले बदल यामुळे पायरिया (हिरड्यांचा एक प्रकारचा आजार)
ही समस्या सामान्य झाली आहे. त्यावर दिवसातून २-३ वेळा मुळ्याच्या रसाने गुळण्या केल्यास फायदा होईल.
जाडेपणा, स्थुलता ही आजकालची अत्यंत सामान्य समस्या. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी मुळ्याच्या रसात लिंबू आणि मीठ घालून प्या. खूप फायदा होईल.