मुंबई : देशभरात मशरूमचे विविध प्रकार आहेत. त्यातील एक महागडं मशरूम म्हणजे गुच्छी मशरूम. गुच्छी मशरूममध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्याचे औषधी नाव मार्क्युला एस्क्यूपलेटा आहे. हे एक स्पंज मशरूम म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. चम्बा, कुल्लू, शिमला, मनालीसह हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या जंगलात हे मशरूम आढळतात. मात्र सध्या फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे मशरूम फार दुर्मिळ पद्धतीने मिळत असल्याने हे फार महागडं मशरूम आहे. भाजीच्या स्वरूपात या मशरूमचं सेवन केलं जातं. यामध्ये बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमीन, व्हिटॅमीन डी आणि काही आवश्यक जसं अमीनो अॅसिड असतात. याच्या सेवनाने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असल्याचा दावा आहे. त्याची मागणी केवळ भारतातच नाही, तर युरोप, अमेरिका, फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांमध्येही आहे.


10,000 रुपये प्रतिकिलो दराने गुच्छी मशरूमची विक्री होते. हे मशरूम हिमाचल, काश्मीर आणि हिमालयातील उच्च डोंगराळ भागात आढळतं. गुच्छी बर्फ वितळल्यानंतर हे उगतं. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यादरम्यान, जेव्हा पर्वतीय भागात ढग वाहू लागतात तेव्हा सकाळपासून गावकरी या मशरूमच्या शोधात जंगलात जातात.


गुच्छी मशरूमचे आरोग्यदायी फायदे


या मशरूममध्ये 32.7 टक्के प्रोटीन, 2 टक्के फॅट, 17.6 टक्के फायबर आणि 38 टक्के कार्बोहायड्रेट असतं. यामुळे हे फार आरोग्यदायी मानलं जातं.


हे 100 ग्रॅम केवळ 31 कॅलरी देतात. त्यामुळे वजन कमी करणारे लोक ते खाऊ शकतात.


100 ग्रॅम गुच्छ मशरूममध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियमचं प्रमाण असतं. रक्तात कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डीची पातळी हाडं आणि दात वाढ आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.


 


टीप- ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची झी 24 तास पुष्टी करत नाही. कोणतेही उपाय करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.