या फायद्यांसाठी रोज सकाळी मोड आलेले चणे खा!
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास तुम्ही लवकर आजारी पडता.
मुंबई : रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास तुम्ही लवकर आजारी पडता. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सोपा उपाय म्हणजे मोड आलेले चणे खाणे. त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतील. तर जाणून घ्या भिजवलेले, मोड आलेले चणे खाण्याचे फायदे...
हिमोग्लोबीन वाढते
रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले चने खाल्याने शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. चण्यात आर्यन आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.
बद्धकोष्ठता होईल दूर
भिजवलेल्या चणांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. त्याचबरोबर पचनक्रियाही सुधारते.
त्वचेच्या समस्या दूर होतात
भिजवलेल्या चण्यांमध्ये मीठ न घालता खाल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात. तसंच त्वचा चमकदार होते.
ऊर्जा मिळते
मोड आलेले चणे खाल्याने ऊर्जा मिळते. यामुळे अशक्तपणा, थकवा दूर होऊन ताजेतवाने वाटते. त्याचबरोबर युरीनसंबंधित समस्याही दूर होतात.