हे आहेत थंडाईचे आरोग्यादायी फायदे!
रंगाचा सळ होळीची दोन दिवसांवर असताना त्याच्या तयारीची लगबग सगळीकडे पाहायला मिळते.
मुंबई : रंगाचा सळ होळीची दोन दिवसांवर असताना त्याच्या तयारीची लगबग सगळीकडे पाहायला मिळते. विविध रंग, पिचकाऱ्या, मिठाई आणि थंडाईने बाजार सजले आहेत. होळीच्या रंगात रंग भरण्यासाठी थंडाई आवर्जून प्यायली जाते. पण तुम्हाला माहित आहे का? की थंडाईचे काही आरोग्यदायी फायदेही आहेत. पाहुया काय आहेत ते फायदे....
बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर
थंडाई काही प्रमाणात असलेल्या खसखसमुळे पोटातील आतड्यांची होणारी जळजळ कमी होते. परिणामी बद्धकोष्ठतेचा त्रासही दूर होतो. त्याचबरोबर थंडाईत प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि मि़नरल्स देखील असतात.
पचनक्रिया सुधारते
थंडाईत काही लोक बडीशेपही टाकतात. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. गॅसेस संबंधिच्या समस्या दूर होतात. बडीशेपमध्ये अॅँटी इंफ्लेमेट्री गुणधर्म असल्याने पचनक्रिया सुधारते.
नैसर्गिक ऊर्जेने परिपूर्ण
थंडाई बनवताना त्यात टरबूज आणि भोपळ्याच्य बिया घातल्या जातात. त्यामुळे शरीराला नैसर्गिक ऊर्जा प्राप्त होते. त्याचबरोबर थंडाईत असलेल्या बदाम, पिस्ता यांसारख्या पदार्थांमुळेही शरीराला ताकद मिळते.
अॅँटी डिप्रेशन गुणधर्म
थंडाईत काळीमिरी आणि लवंग असे मसाल्याचे पदार्थ असतात. त्यामुळे इम्युनिटी सिस्टमसाठी ते अतिशय फायदेशीर असते. त्याचबरोबर थंडाईत असलेल्या अॅँटी डिप्रेशन आणि अॅंटी ऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे आरोग्यासाठी फायदेशीर ठऱते.