मुंबई : आपल्या संस्कृतीत तुळशीला फार महत्त्व आहे. तुळस पवित्र असल्याने प्रत्येकाच्या अंगणात स्थान मिळाले आहे. या पौराणिक महत्त्वाबरोबर याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. तुळशीच्या नियमित सेवनाने अनेक आजार, विकारांपासून सुटका मिळण्यास मदत होते. तुम्हाला माहित आहेत का तुळशीचे हे फायदे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डागांपासून सुटका


तुळशीची पाने वाटून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने डाग, पिंपल्स दूर होण्यास मदत होते. तुळशीत अंटी बायोटिक गुणधर्म असतात. त्यामुळे कोणतेही एलर्जी होण्यापासून संरक्षण होते.


सर्दी-खोकल्यावर परिणामकारक


तुळशीच्या पानांनी सर्दी-खोकल्यावर आराम मिळतो. रोज तुळशीची ४-५ पाने खाण्यास फायदा मिळतो. 


तोंडाची दुर्गंधी दूर होते


तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास तुळस फायदेशीर ठरते. त्याचबरोबर त्याचे कोणतेही साईड इफेक्टस होत नाही. 


जखम झाल्यास


जखम भरण्यास तुळशीचा फायदा होतो. यातील अंटी बॅक्टीरिअल गुणधर्मांमुळे इंफेक्शन वाढत नाही आणि जखम लवकर भरण्यास मदत होते.


दुखण्यावर


तुळशीचे तेल दुखण्यावर उपयोगी पडते. शरीरातील कोणताही अवयव दुखत असल्यास त्यावर तुळशीच्या तेलाचा प्रयोग करा. दुखण्यावर आराम मिळेल.


दमा, टीबीच्या आजारावर फायदेशीर


दमा, टीबी असल्यास तुळशीचे नियमित सेवन करा. त्यामुळे हे त्रास वाढणार नाहीत.