या आरोग्यदायी फायद्यांसाठी अवश्य घ्या लोण्याचा आस्वाद !
तुम्ही कधी ताक घुसळून लोणी काढलंय ? किंवा आईला, आजीला लोणी काढताना बघितलंय ? बघितलं असेल तर लोणी काढताना त्याचा एक गोळा पटकन पोटात गेला असेल. आजीकडून कृष्ण लोणी चोरून खात असल्याच्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत. पण लोण्याचे फायदे आपल्याला माहित आहेत का ?
बटर आणि लोणी:
बटर हे सॉल्टेड असून त्यात अधिक प्रमाणात बीटा कॅरोटीन असतं. तर लोणी हे अनस्याच्युरेटेड असून त्यात बीटा कॅरोटीन कमी प्रमाणात असतं. आणि सोल्युबल फॅट्स असतात. बटर पिवळ्या तर लोणी पांढऱ्या रंगाचं असतं. हा रंगातील फरक फॅट्सच्या अधिक प्रमाणावरून ठरतो. सॉल्टेड बटर अधिक काळ टिकण्यासाठी त्यात सॉल्ट म्हणजेच मीठ घातले जाते. मीठ हे नैसर्गिक प्रिसर्व्हेटिव्ह आहे. परंतु, त्याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे कॅलरीज वाढू शकतात. शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते. तसंच त्यात असलेल्या सॅच्युरेटेड फॅट्समुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. HealthifyMe च्या नुसार १ चमचा लोण्यातून फक्त १०३.५ कॅलरीज तर १ चमचा सॉल्टेड बटरमधून सुमारे २०० कॅलरीज मिळतात.
लोण्याचे फायदे:
सेलिब्रिटी न्यूट्रीशियनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्या सल्ल्यानुसार लोण्यामध्ये शरीराला उपयुक्त असे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया लोण्याचे फायदे.
वजन कमी करण्यास मदत होते: लोणी हा lecithin चा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे मेटॅबॉलिझम प्रक्रीयेला आणि कोलेस्ट्रॉल व इतर फॅट्स शरीरात जमा होण्याला मदत होते. त्यामुळे फॅटचे विघटन अधिक चांगल्या पद्धतीने होते. परिणामी वजन कमी होते. त्याचबरोबर बटर खाण्याची इच्छा पूर्ण होते आणि कमी कॅलरीज पोटात गेल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
रोगप्रतिकारकशक्ती वाढते: लोण्यामुळे कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, डी यांचे प्रमाण शरीरात राखून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. कशी वाढवाल तुमची रोगप्रतिकारशक्ती ?
त्वचा हेल्दी राहते: लोण्यामध्ये व्हिटॅमिन ई, सेलिनियम हे अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असल्याने त्वचा मऊ राहण्यास मदत होते. त्वचेची लवचिकता टिकून राहते व त्वचा हेल्दी राहते. टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी ही १० फळे आणि भाज्या खा !
इन्फेकशनला मात करण्यासाठी फायदेशीर: लोण्यात अँटीफंगल आणि अँटी बॅक्टरील गुणधर्म असल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. ताप, पोटाचे इन्फेकशन यांसारखे लहान सहान इन्फेकशनवर मात करण्यासाठी फायदेशीर ठरते.
कॅन्सरशी सामना करण्यास उपयुक्त: लोण्यामध्ये conjugated linoleic acid (CLA) बरोबरच फॅटी अॅसिड्स असतात. त्यात कॅन्सरशी सामना करण्यास उपयुक्त असे गुणधर्म असतात.
आयुर्वेदात सांगितलेले लोण्याचे फायदे:
आयुर्वेदानुसार निद्रानाश, अंथरुणात लघवी करणे तसंच erectile dysfunction यांसारखे सेक्स संबंधित समस्या दूर करण्यासाठी लोणी हा घरगुती उपाय आहे. गरोदरपणात लोणी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण वाढत्या बाळाच्या पोषणासाठी आणि प्रसूती वेदना कमी करण्यासाठी लोणी फायदेशीर असते.
लोणी बनवण्याची पद्धत:
तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने लोणी बनवू शकता.
कृती:
दुधात थोडं विरजण (घरी बनवलेलं दही) घाला आणि रात्रभर ते मिश्रण तसंच ठेवा.
सकाळी तयार झालेल्या दह्यात हॅन्ड ब्लेंडर फिरवा किंवा रवीने घुसळा. लोण्याचा गोळा वेगळा होईपर्यंत ब्लेंडर फिरवत रहा.
लोण्याचा गोळा वेगळा काढा आणि पराठा, थालीपीठ यासोबत तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता.