हैदराबाद : जांभूळ औषधी आहे. मात्र, आता जांभळाच्या बियांपासून गढूळ पाणी स्वच्छ होऊ शकते. तसे प्रयोगांती सिद्ध झालेय. येथील आयआयटीतील संशोधकांनी जांभळाच्या बियांपासून पाणी स्वच्छ करण्याचे तंत्र विकसित केलेय. जांभळापासून जमिनीतील पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, हे प्रयोगाने सिद्ध केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जांभळाच्या झाडात पाणी शुद्ध करण्याचा गुणधर्म आहे. आयआयटी हैदराबादच्या केमिकल इंजीनिअरिंग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक चंद्रशेखर शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जांभळाच्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या कार्बनचा उपयोग करण्यात आला. या कार्बनच्या माध्यमातून पाण्यातील प्लोराईडचा स्तर कमी करण्यास मदत मिळाली. अनेक राज्यात जमिनीतील पाण्यात जास्त प्रमाणात फ्लोराइडची मात्रा दिसून येते. ही एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे जांभळाच्या बियांवरील संशोधनामुळे पाणी स्वच्छ करता येणार आहे.


एक लिटर पाण्यात फ्लोराइडची मात्रा १.५ असते. मात्र, जांभळाच्या बियांच्या उपयोग करुन ही मात्रा मिलीग्राम पेक्षा कमी करण्यात येश आले आहे. त्यामुळे देशातील १७ राज्यांत भूजलातील फ्लोराइडची समस्या दूर होण्यास मदत होऊन पाणी पिण्या योग्य होईल, असा दावा प्रा. चंद्रशेखर शर्मा यांनी केलाय.


जांभळाचा उपयोग काय?


जांभळाची लागवड प्रामुख्याने उष्ण आणि समशितोष्ण हवामानात केली जाते. कोकणात आणि पूर्व विदर्भात उष्ण दमट हवामान असल्यामुळे या वातावरणात जांभळाच्या वाढीकरिता पोषक असेत.


जांभळाला औषधी महत्त्व आहे.  साल, पाने, फळे, बिया आदी औषधी उपयुक्त भाग आहेत. तर जांभूळ तुरट, मधुर, पाचक व मलस्तंभक आहे. रूक्ष, रुचीकर, आंबट , कंठाला हितकर असून, पित्त दाह, कृमी, श्वास, शोष, अतीसार, कास, रक्तदोष, कफ, व्रण यांचा नाश करते आदी याचे औषधी गुणधर्म आहेत.


औषध म्हणून जांभळाला महत्व


औषधी म्हणून जांभळाला महत्व आहे. याचा उपयोग अतीसार, खोकला, पित्त, शोष, दाह, रक्तदोष, कंठरोग इत्यादी रोगात बरा होतो. कषाय व शीत गुणामुळे कफ व पित्ताचा नाश होतो. सालीत रक्तपित्त शामक गुण आहे. प्लीहा व यकृताच्या विकारामध्ये जांभूळ हे जालिम औषध आहे. 


जांभळाच्या झाडात पाणी शुद्ध करण्याचा गुणधर्म आहे. जांभळाचा शिरका अतीसार, मोडशी, उदर रोगात वापरतात. दातांच्या आजाराकरिता जांभळाची साल उपयुक्त आहे. जांभळाचा रस यकृताला कार्यक्षम बनविते. मूत्राशयाचा दाह आणि पोटाच्या तक्रारी दूर करतो. मधुमेह, अपचन, जुलाब, मुरडा, संग्रहणी, मुतखडा, रक्त पित्त आणि रक्तदोष आदी विकारात रसाचा उपयोग चांगला होतो.