मुंबई : आपल्याला कोणतंही टेन्शन आलं, स्ट्रेस आलं तरी आपण सगळ्यात पहिली गोष्टं करतो ती, म्हणजे आपली बोटं मोडणे. एवढेच काय तर आपण आपल्या रिकामी वेळात किंवा कधीही आपली बोटं मोडत असतात. काही वेळा आपण जास्त काम करतो, तेव्हा देखील आपले हात दुखतात म्हणून आपण बोटं मोडतो. ज्यामुळे आपल्याला थोडा आराम मिळतो. परंतु ही तुमची सवय तुम्हाला महागात पडू शकते. कारण असे करणे तुमच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरांच्या मते, जर आपण आपल्या हातांची किंवा पायांची बोटं मोडली, तर त्याचा आपल्या हाडांवर वाईट परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम आपल्या कार्य करण्याच्या क्षमतेवरही होऊ शकतो. त्यामुळे तुम्हालाही जर अशी सवय असेल, तर ताबडतोब तुमची ही सवय सोडा.


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बोटांना मोडल्याने संधिवात होते. अहवालानुसार, आपली हाडे एकमेकांना जोडले असतात. त्यामुळे आपण वारंवार आपल्या बोटांना मोडल्याने, आपल्या शरीरामधील synovial fluid कमी होते. जर आपण हे सारखे सारखे केले, तर आपल्याला आयुष्यभर संधिवाताचा त्रास सहन करावा लागू शकतो.


आपल्या शरीरातात अनेक जॉइंट्स असतात, या जॉइंट्समध्ये एक प्रकारचे लिक्विड असते. जे आपल्या शरीराची हाडे जोडण्यास आपल्याला मदत करते. या लिक्विडचे नाव synovial fluid आहे.


synovial fluid आपल्या शरीरात ग्रीसचे काम करते. याचा अर्थ असा की, हा लिक्विड हाडे एकमेकांसोबत घासण्यापासून रोखतो. synovial fluid मध्ये उपस्थित असलेल्या वायूमधून कार्बन डाय ऑक्साईड एक नवीन जागा तयार करते. ज्यामुळे फुगे बनतात. जेव्हा आपण हाडे फोडतो तेव्हा हे फुगे फुटतात. ज्यामुळे आपल्या बोटांमध्ये समस्या निर्माण होऊ शकते.


एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जास्त बोटाने मोडल्याने आपल्या हाताला सूज येते. तसेच, आपल्या सॉफ्ट टिश्यूजमध्ये देखील सूज येऊ शकते. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, जर आपण सारखे सारखे बोटं मोडली तर, कालांतराने आपली बोटं काम करणे थांबवू शकतात.