Chinese Mystery Disease: चीनमध्ये एका रहस्यमयी आजाराने (Pneumonia) देशाची चिंता वाढवली आहे. या आजारामुळे लहान मुलं आजारी पडत आहेत.  श्वासोच्छवासासंबंधीत न्यूमोनिया आजाराने मोठ्या संख्येने मुलं बाधित होत असल्याचा दावा वैद्यकीय अहवालात करण्यात आला आहे.पण चीनी सरकार (china Government) कोरोनाप्रमाणे (Corona) हा आजारही लपवण्याचा प्रयत्न करत आ.  जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) याची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी चीन सरकारकडून माहिती घेतली आहे. दरम्यान, भारत सरकार या आजाराबाबत सतर्क झाला आहे. या आजारावर बारकाईने लक्ष ठेवलं जात असू हा आजार भारतासाठी किती धोकादायक ठरू शकतो? देशात किती परिणाम होईल? आणि झालाच तर सरकार किती तयार आहे? याचा आढावा घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत सरकार सतर्क
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केलं असून चीनमधील मुलांमध्ये निमोनियाच्या नोंदलेल्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आलंय. आतापर्यंतच्या अभ्यासानुसार या आजाराचा भारताला धोका कमी असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण चीनमध्ये ज्या वेगाने हा आजार मुलांमध्ये पसरत आहे त्यामुळे चिंता नक्कीच वाढली आहे. कारण कोरोनासारखा लहान मुलांचा हा आजार पसरला तर परिस्थिती किती धोकादायक असेल याची कल्पनाही करणं कठीण आहे. जगातील अनेक देश यासाठी सक्रिय झाले आहेत.


भारतासह जगभरात अलर्ट
चिनी मुलांच्या रहस्यमय न्यूमोनियामुळे भारत सरकारने अलर्ट जारी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिीतीनुसार भारतात तापाच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. यासंदर्भात DGHS च्या देखरेखीखाली आरोग्य मंत्रालयात तातडीची बैठकही घेण्यात आली. ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझाची प्रकरणे आढळल्यानंतर भारतातील आरोग्य यंत्रणांची पुन्हा तपासणी करण्यात आली असल्याचं आरोग्य विभागने सांगितंलय.


चीनी अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली आहे. चिनी अधिकार्‍यांनी कोरोना निर्बंध हटवल्यामुळे इन्फ्लूएन्झा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया यांसारख्या अज्ञात आजार वाढण्याला त्यांनी चीनला जबाबदार धरलं आहे. या सर्व रोगांमध्ये एक गोष्ट साम्य आहे ती  म्हणजे या आजाराचा जीवाणूही संसर्गजन्य आहे आणि तो लहान मुलांना प्रभावित करतो. ProMed नुसार, चीनमध्ये केवळ विद्यार्थीच आजारी नाहीत, तर अनेक शिक्षकांनाही न्यूमोनियाची लागण झाली आहे.ProMED ही एक सार्वजनिक आरोग्यावर काम करणारी एक मोठी संस्था आहे. जगभरातील मानवी आणि प्राण्यांच्या रहस्यमयी आजारांवर या संस्थेचं लक्ष असंत आणि त्यादृष्टीने ते काम करतात.