Dry Throat Causes: आपलं संपूर्ण जीवन पाण्यावरच अवलंबून आहे. आपलं शरीर हे 70 टक्के पाण्यानं व्यापलेलं असतं आणि शरीराच्या प्रत्येक पेशीमध्येही पाणी असतं. शरीरातल्या सगळ्या महत्त्वाच्या क्रियांमध्ये पाण्याची महत्त्वाची भूमिका बजावते. पाणी शरीरातल्या सगळ्या नको असणाऱ्या गोष्टी घाम, लघवी अशा माध्यमातून बाहेर टाकतं. पाण्याशिवाय आपलं शरीर कामच करू शकत नाही. त्यामुळे पाणी पिणं किती गरजेचं आहे याचा अंदाज येतो. जेव्हा आपला घसा कोरडा पडतो, घसा खवखवतो तेव्हा आपण पाणी पितो. कारण पाणी प्यायल्याने घसा थंड होतो आणि ओलसर राहतो. मात्र अनेकांना पाणी प्यायल्यानंतरही घसा कोरडा होण्यासारख्या समस्या जाणवते. जर पाणी प्यायल्यानंतरही तुमचा घसा कोरडा होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यामागे अनेक कारणे असू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिहायड्रेशन: घशातील कोरडेपणामागे डिहायड्रेशन कारण असू शकते. जेव्हा तुम्ही डिहायड्रेट असता तेव्हा शरीर आवश्यक तेवढी लाळ निर्माण करत नाही. अशा स्थितीत घसा कोरडा पडतो. त्यामुळे पाणी प्यायल्यानंतरही तोंड कोरडे पडण्याची समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.


तोंड उघडे ठेवून झोपणे: जर तुम्ही रात्री तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असेल तर तुम्हाला घसा कोरडा पडण्याची समस्या होऊ शकते. कारण तोंड उघडे ठेवून झोपल्याने लाळ सुकते. यामुळे तोंड आणि घसा कोरडा पडतो. या काळात तुम्हाला घोरणे आणि थकवा येण्याची समस्या देखील जाणवू शकते.


ताप आणि ऍलर्जी:  ताप किंवा हंगामी ऍलर्जीमुळे देखील घसा कोरडा पडू शकतो. त्यामुळे पाणी प्यायल्यानंतर घसा कोरडा होत असेल तर ते अॅलर्जीचेही लक्षण असू शकते. या दरम्यान, तुम्हाला नाक वाहणे, शिंका येणे, खाज येणे, खोकला यासारख्या समस्या देखील जाणवू शकतात. दुसरीकडे, जर तुम्ही तोंडातून श्वास घेत असाल तर यामुळे तुमचा घसाही कोरडा होऊ शकतो.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)