High Ammonia Foods: सावधान ! हे 5 पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी घातक, धोकादायक ठरतो त्यातील अमोनिया
Foods That contain Ammonia: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर धोका जास्त पटीने वाढतो. तुमच्या खाण्यात काय असावे आणि काय असू नये याचा विचार करण्याची गरज आहे. बऱ्याचवेळा आपण कोणतेही पदार्थ खात असतो. मात्र, त्याचा काय परिणाम होतो, ते आपल्याला माहीत नसते. अशाच काही धोकादायक पदार्थांची माहिती जाणून घ्या. हे पाच पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी धोकादायक आहे.
Foods that are High in Ammonia : आपण जे पदार्थ खातो, त्याबाबत बऱ्याचवेळा आपल्याला माहिती नसते की, याचा आरोग्यावर काय परिणाम होतो. (Health Tips) बर्याच लोकांना हे माहित नसेल की अमोनिया अन्नपदार्थांमध्ये देखील आढळतो. बहुतेक प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये अमोनिया आढळतात. परंतु अशा अनेक भाज्या देखील आहेत, ज्यामध्ये अमोनिया आधीपासूनच आहे. जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर ते शरीराला मोठा धोका पोहोचवतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आहारावर नियंत्रण सर्वात महत्त्वाचे आहे. आहार खराब असेल तर शरीराची स्थिती बिघडत जाते. अमोनियाचा सर्रास वापर अनेक गोष्टींमध्ये होतो. वस्तू स्वच्छ करण्यासाठी कारखान्यांमध्ये याचा वापर केला जातो. हे लादी स्वच्छ करण्यासाठी देखील वापरले जाते. (Health News)
जर अमोनियाची पातळी मर्यादित प्रमाणात असेल तर मूत्रपिंड आणि लिव्हर ते काढून टाकतात. पण जर त्याची पातळी जास्त असेल तर ते मेंदू, किडनी आणि लिव्हरला नुकसान पोहोचवते. त्यामुळे सर्दी-खोकला जास्त होतो. त्वचेवर पुरळ येतात. जेव्हा जास्त अमोनिया शरीरात प्रवेश करतो तेव्हा श्वास घेण्यास त्रास होतो.
या पदार्थांमध्ये अमोनियाचे प्रमाण जास्त असते
कांदा
कांदा खूप आवडीने खाल्ला जातो. परंतु 100 ग्रॅम कांद्यामध्ये 0.027 ग्रॅम अमोनिया असतो. ही पातळी खूप कमी असली तरी वारंवार कांदा खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते.
बटाट्याचे चिप्स
बटाट्याचे चिप्समध्यो मोठ्याप्रमाणात अमोनिया आढळतो. पॅकेज केलेल्या वस्तूंमध्ये अमोनियाचे प्रमाण कमी असते. 100 ग्रॅम बटाटा चिप्समध्ये अमोनियाची पातळी 0.024 ग्रॅम असते. पण ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने अमोनियाची पातळी वाढू शकते.
मांस उत्पादने
मांसावर प्रक्रिया करुन बनवलेल्या वस्तूंमध्ये अमोनियाची पातळी खूप जास्त असते. सलामी मांस पिझ्झा, सँडविच, पास्ता आणि सॅलडमध्ये जोडले जाते. त्यामुळे त्यांचे सेवन कमी प्रमाणात करावे.
पीनट्स बटर
सुमारे 100 ग्रॅम पीनट बटरमध्ये अमोनियाची पातळी 0.049 ग्रॅम असते. त्यात असलेला अमोनिया देखील शरीराला हानी पोहोचवू शकतो.
चीज
चीजमध्ये अमोनिया मोठ्या प्रमाणात आढळतो. सँडविच, बर्गर, पिझ्झा आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. बहुतेक सॅच्युरेटेड ब्लू चीजमध्ये अमोनिया आढळतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)