मुंबई : दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. केवळ लहान मुलेच नाही तर मोठ्यांनाही याचे दररोज सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. बहुतेक घरांमध्ये असे म्हटले जाते की, जे मूल दररोज दूध पिते ते नेहमीच निरोगी आणि सक्रिय असते. परंतु अशा काही गोष्टी आहेत, ज्याचे दुधासोबत सेवन करने तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुतेक प्रकरणांमध्ये, आजकाल लोक अपुऱ्या माहितीमुळे दुधासोबत कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचे सेवन करतात, परंतु असे केल्याने दूधाचा शरीराला फायदा होण्याऐवजी त्यापासून नुकसानच होते.


आज आम्ही तुम्हाला अशाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या गोष्टी दुधासोबत खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे या गोष्टी दुधासोबत कोणत्याही परिस्थितीत सेवन करू नयेत.


मुळा


नाश्त्यात मुळ्याच्या भाजीचे पराठे खाल्ल्यानंतर लगेचच लोक दूध पितात. परंतु तज्ज्ञांच्या मते, यामुळे दूध विषाप्रमाणे आपल्या शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे त्वचेचे आजारही होऊ शकतात. मुळा खाल्ल्यानंतर सुमारे 2 तासांनी दूध प्यावे असा सल्ला दिला जातो.


उडदाची डाळ


उडीदत नाहीत तर या सारख्या कोणत्याही डाळाचे दुधासोबत सेवन करने टाळावे? विशेषतः जर त्यात मीठ किंवा आम्लयुक्त घटक मिसळले असतील तर, त्यासोबत दूध अजिबात पिऊ नये. 


आजकाल मोड आलेले, कडधान्ये खाल्ल्यानंतर दूध पिण्याची चूक लोक करत आहेत, परंतु तज्ज्ञांच्या मते, हे हानिकारक ठरू शकतं. उडीद डाळ दुधासोबत खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो असे म्हटले जाते.


खारट गोष्टी


दुधाचा आणि खारट गोष्टींबद्दल तर सर्वांना माहीत आहे. असे असूनही, बरेच लोक आंबट किंवा खारट नाश्ता केल्यानंतर दूध पितात. किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच दूध पिण्यास प्राधान्य देतात. परंतु आयुर्वेदानुसार हे दुध शरीरासाठी चांगले नाही. यामुळे त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात.


फळ


आंबट वर्गाची फळे दुधासोबत खाऊ नयेत. तसेच, केळी हे आंबट असल्यामुळे त्याच्यासोबत दुधाचे सेवन करणं चांगलं नाही. दूध आणि केळीचे एकत्र सेवन केल्याने कफची समस्या निर्माण होते आणि त्याचा पचनसंस्थेवरही परिणाम होतो.