मुंबई : आजकाल लोकांमध्ये व्यस्त जिवन शैलीमुळे तणाव ही एक मोठी समस्या बनली आहे. हा तणाव जेव्हा वाढतो, तेव्हा तो नैराश्याचे रूप घेतो. आपण बऱ्याचदा डिप्रेशनमुळे जास्त झोपतो किंवा जास्त खातो. काही वेळा डिप्रेशनमध्ये झोप देखील येत नाही. परंतु लोकं बऱ्याचदा असे अनेक पदार्थ खातात ज्या गोष्टी खाल्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशावेळी काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वेळा तणाव आणि नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी लोक दारू पिण्यास सुरुवात करतात. परंतु लोकांना हे माहित नाही की, अल्कोहोलमुळे त्यांची समस्या आणखी वाढू शकते, ज्याचा वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावरती होऊ शकतो. अल्कोहोल हे नैराश्य आणि चिंता वाढवण्याचे काम करते. त्यामुळे जर तुम्ही नैराश्याने त्रस्त असाल आणि दारूचे सेवन करत असाल तर आजच दारू सोडण्याचा संकल्प करा.


अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, जर तुम्ही कॉफीचे जास्त सेवन केले तर ते तुमची समस्या देखील वाढवू शकते. कॉफीनमुळे तुमची झोप खराब होते, ज्यामुळे व्यक्तीचा ताण वाढतो. अशा स्थितीत डिप्रेशनची समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे नैराश्यात असलेल्या रुग्णांनी कॉफीचे जास्त सेवन करू नये.


फास्ट फूड आणि जंक फूडचे सेवन ही आजकाल संस्कृती बनली आहे. पण त्याचे अतिसेवन नैराश्याच्या रुग्णांसाठी चांगले नाही. सर्वसाधारणपणे, फास्ट फूड आणि जंक फूड लोकांसाठी चांगले मानले जात नाही. याशिवाय कोल्ड्रिंक्स, गोड पेये, शीतपेये, सोडा, एनर्जी ड्रिंक्स इत्यादी कृत्रिम गोड पदार्थांपासून अंतर ठेवा.


धूम्रपान हे सर्व रोगांचे मूळ देखील मानले जाते. धूम्रपानामुळे तणावाची पातळी देखील वाढते. डिप्रेशनमध्ये बरेच लोक जास्त सिगारेट ओढतात, त्यामुळे त्यांची स्थिती गंभीर रूप धारण करू शकते. त्यामुळे या गोष्टींची सवय तुम्हाला असेल तर ती आत्ताच सोडा आणि आनंदी जीवन जगा.