Washing Toothbrush is Enough? : दर दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळीला जाण्याआधी अनेकांचाच दात स्वच्छ करण्याचा कार्यक्रम असतो. ज्यासाठी जवळपास सारेच टूथब्रशचा वापर करतात. Toothbrush ही एक अशी कमाल गोष्ट आहे ज्यामुळं तुमचे दात स्वच्छ होऊन तोंडाच्या स्वच्छतेचे निकष सहजपणे पाळता येतात. हा टूथब्रश दात स्वच्छ करतो खरा, पण त्याच्या स्वच्छतेची तुम्ही कितपत काळजी घेता? बरं, तो स्वच्छ करतही असाल तर नेमका कसा स्वच्छ करता? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या ज्या टूथब्रश्नं तुम्ही दात स्वच्छ करता त्यावर कोट्यवधी जीवजंतू असतात. फक्त बॅक्टेरियाच नव्हे, तर अनेक प्रकारचे व्हायरस आणि जंतूही त्यावर आसरा घेत असतात, ज्यामुळं अनेकदा आजारपण बळावतं. म्हणूनच टूथब्रश फक्त पाण्यानं स्वच्छ करणं पुरेसं नाही असं तज्ज्ञमंडळी कायम सांगतात. 


तज्ज्ञांच्या माहितीनुसार आठवड्यातून दोनदा टूथब्रश व्यवस्थित स्वच्छ करावा. यासाठी डेंचर नावाच्या गोळीचा वापर करावा. कोणत्याही औषधांच्या दुकानात तुम्हाला ती मिळू शकते. एक कप पाण्यामध्ये ही गोळी विरघळवून त्यात टूथब्रश रात्रभर बुडवून ठेवा. असं केल्यानं टूथब्रशमधील बरेच जीवजंतू नष्ट होतात. 


ब्रशनं दात स्वच्छ केल्यानंतर मीठाच्या पाण्यानं तोंड स्वच्छ धुवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मीठामध्ये असणाऱ्या अँटीबॅक्टेरियल गुणांमुळं तोंडातील दुर्गंधी आणि तत्सम समस्या नाहीशा होतात. दात किडले असल्यासही मिळाच्या पाण्यानं गुळण्या करणं फायद्याचं ठरतं. 


हेसुद्धा वाचा : Indian Railway : रेल्वे डब्यात घाणीचं साम्राज्य? कुठे तक्रार करायची? हे घ्या Helpline Numbers


राहिला मुद्दा टूथब्रशच्या स्वच्छतेचा तर, त्यावर बरेच सूक्ष्म जीवजंतू असल्यामुळं तो फक्त पाण्यानं धुवून घेणं पुरेसं नसतं. तुम्ही ज्या टूथब्रश होल्डरमध्ये ब्रश ठेवता त्यातही बरेच जंतू असण्याची शक्यता असते. ज्यामुळं तुम्ही ते भांडंही स्वच्छ ठेवणं अपेक्षित असतं. 


(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची पुष्टी करत नाही. इथं तज्ज्ञांनी दिलेला सल्ला अवलंबण्यापूर्वी माहितीची खातरजमा करून घ्या. )