Indian Railway : रेल्वे डब्यात घाणीचं साम्राज्य? कुठे तक्रार करायची? हे घ्या Helpline Numbers

Indian Railway : आतापर्यंत अनेकांनीच या रेल्वेनं प्रवास केला असेल किंवा काहीजण प्रवासासाठी सज्जही असतील. पण, प्रवासाला निघण्यापूर्वी ही महत्त्वाची माहिती तुमच्या हाताशी नक्की ठेवा.   

Apr 15, 2024, 11:37 AM IST

Indian Railway : भारतीय रेल्वेसेवा देशातील नागरिकांना एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी अविरत सेवा करत असते. अशा या रेल्वे विभागाची जगभरात ख्याती आहे. तुम्ही कल्पनाही करणार नाही, अशा गावखेड्यांपर्यंत हे रेल्वेचं जाळ पसरलं आहे. 

 

1/8

रेल्वे प्रवास

indian Railway Helpline Numbers for dirty coach

Indian Railway : रेल्वेनं प्रवास करत असताना प्रवासी काही अपेक्षा ठेवूनच रेल्वेच्या डब्यात प्रवेश करतता. प्रवास लांब पल्ल्याचा असेल तर, अनेक मंडळी तो आरामदायी करण्याच्या हेतूनं वातानुकुलित आसनं आरक्षित करतात.   

2/8

रेल्वेगाड्या

indian Railway Helpline Numbers for dirty coach

राजधानी, गरिबरथ या आणि अशा कैक रेल्वेगाड्यांकडून किमान दरात प्रवासाची चांगली सुविधा पुरवण्याचा प्रयत्न असतो. पण, काही प्रसंग असेही येतात जिथं हीच रेल्वे हिरमोड करताना दिसते. कारण ठरतं ते म्हणजे प्रवास सुरु होण्याआधीच रेल्वे डब्यामध्ये असणारी घाण, कचरा.   

3/8

तक्रार कुठं करायची?

indian Railway Helpline Numbers for dirty coach

रेल्वे डब्यामध्ये असणारा हा कचरा पाहून अनेकांच्या चेहऱ्याचा रंग उडतो आणि मग मनस्ताप करण्याचीच वेळ येते. या प्रसंगी तुम्ही तक्रार कुठं करायची हे माहितीये?   

4/8

रेल्वेच्या सुविधा

indian Railway Helpline Numbers for dirty coach

रेल्वे प्रवास करत असताना प्रवाशांनी काही नियमांचं पालन करणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणं प्रवाशांकडून आकारल्या जाणाऱ्या पैशांच्या तुलनेत त्यांना योग्य त्या सुविधा पुरवणं रेल्वे प्रशासनाचं काम आहे. पण, अनेकदा तसं होताना दिसत नाही.   

5/8

प्रवासाचा बेरंग

indian Railway Helpline Numbers for dirty coach

प्रवाशांकडून सातत्यानं दुर्लक्षित राहणारा रेल्वे डब्यांमधील कचरा अनेकांच्याच प्रवासाचा बेरंग करताना दिसतो, अशा वेळी हा कचरा तातडीनं उचलला जावा यासाठी प्रवासीच हा मुद्दा उचलून धरू शकतात.   

6/8

हेल्पलाईन क्रमांक

indian Railway Helpline Numbers for dirty coach

रेल्वे कोचच्या स्वच्छतेसाठी प्रवाशांनी 7208073768 / 9904411439 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधत त्यावर कचरा कुठं आहे, कोणत्या डब्यात आहे यासंदर्भातील माहिती द्यावी.   

7/8

संकेतस्थळ

indian Railway Helpline Numbers for dirty coach

याशिवाय तुम्ही cleanmycoach.com या संकेतस्थळावर जाऊनही तुमची तक्रार प्रवासादरम्यानच नोंदवू शकता. इथं तक्रार नोंदवताना तुम्ही PNR क्रमांक आणि तुमचा दूरध्वनी क्रमांक देणं अपेक्षित असतं.   

8/8

स्वच्छता कर्मचारी

indian Railway Helpline Numbers for dirty coach

वरील ठिकाणांवर तुमच्या नावे तक्रार दाखल होताच 15 ते 20 मिनिटांमध्ये रेल्वेचे स्वच्छता कर्मचारी तिथं येऊन कचरा उचलून ती जागा स्वच्छ करून जातील.