चटपटीत चिप्स खाताय? सावधान ! जिभेचे चोचले तुमचं आयुष्य कमी करणार?
बाजारात झटपट मिळणारे चटपटीत पदार्थ आपण आवडीने खातो आणि लहानमुलांनाही देतो, पण याच पदार्थांमुळे आपलं आयुष्य कमी होतंय.
Viral News : बर्गर, बिस्किट, भुजिया असे जिभेचे चोचले पुरवणारे आणि बाजारात झटपट मिळणारे चटपटीत पदार्थ (Junk Food) आपणही खातो आणि लहान मुलांनाही खायला देतो. त्यांची चवच अशी असते की हे पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. मात्र तुम्हाला हे माहितीये का? बाजारात मिळणाऱ्या अशा अनेक खाद्यपदार्थांमध्ये इतकं हानीकारक चीज (Harmful Cheese) असतं की त्यामुळे तुमचं आयुष्य कमी होऊ शकतं...त्याचं नाव आहे ट्रान्स फॅट
ट्रान्सफॅट (Trans Fat) हा असा एक प्रकार आहे ज्याला अन सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड (Saturated fatty acids) असं म्हंटलं जातं. जेव्हा यापासून वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार केले जातात तेव्हा हे आरोग्यासाठी विष बनतं. ट्रान्सफॅटचा वापर हा वनस्पती तेलांमध्ये हायड्रोजन (Hydrogen) मिक्स करून करण्यात येतो. खाद्यपदार्थ अधिक टिकावे यासाठी याचा वापर करण्यात येतो.
देशी तूप किंवा लोणी हे ट्रान्स फॅट नाही. मात्र एखादं रिफाईंड ऑईल (Refined Oil) तीनपेक्षा जास्तवेळ तापवलं तर त्याचं रूपांतर ट्रान्स फॅटमध्ये होतं. ट्रान्स फॅटमुळे कोलेस्ट्रॉलचं (Cholesterol) प्रमाण वाढतं. हा ट्रान्सफॅट हृदयाच्या धमन्या बंद करतं त्यामुळे हार्टअटॅक येऊ शकतो. यकृत खराब होऊ शकतं. इतकंच नाही तर तुमच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो.
WHOच्या ताज्या अहवालानुसार ट्रान्स फॅटमुळे जगभरातील 5 अब्ज लोकांचं आयुष्य घटलंय. त्यांना हृदयविकाराचा सामना करावा लागतोय. WHOनं 2023 पर्यंत खाद्यपदार्थांमधून ट्रान्स फॅट संपवण्याचं आवाहन केलंय. आतापर्यंत 43 देशांनी या मोहिमेत सहभाग घेतला. 2022 पासून भारतानेही खाद्य पदार्थांमधून ट्रान्स फॅटचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आता हेही जाणून घेऊयात की तुम्ही खात असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये ट्रान्स फॅटचं प्रमाण नेमकं किती असायला हवं.
WHOच्या मानकानुसार 100 ग्रामच्या खाद्य पदार्थांमध्ये 2 ग्रामपेक्षा जास्त ट्रान्स फॅट असता कामा नये..डब्बाबंद रिफाईड तेलात हायड्रोजनचं प्रमाण जास्त असल्यास त्या तेलावर बंदी आणावी..भारतात FSSIनं 2022 पासून हे नियम लागू केले आहेत.
ट्रान्स फॅट आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे तुम्हीही ट्रान्स फॅटयुक्त पदार्थ खाणं टाळा...भारतानं सुरू केलेल्या मोहिमेत सहभागी व्हा..तुम्ही सदृढ असाल तर देशाचं आरोग्यही सदृढ राहिल.