Eggs Vegetarian or Non-Vegetarian : अंडं हे सुपरफूड मानलं जातं, दररोज अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. कारण अंड्यात  Protein, Vitamins, Minerals आणि Vitamin B असतं. ज्यामुळे शरीराचा विकास होतो. अंड्यांमध्ये असलेल्या Vitamin B 12 आणि Folic Acid मुळे मेंदू तल्लख होतं. अंड्यांमधील प्रथिनांमुळे शरीरातील स्नायूंचा विकास होतो. अंड्यांमुळे वजन नियंत्रणात राहातं. इतके फायदे असनही अंडं शाकाहारी आहे की मांसाही याबाबत अनेक वाद आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंडं शाकाहारी असल्याचा दावा
अंडं हे शाकाहारी असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. अंडं देण्यासाठी नरासोबत कोंबडीचं मिलन होण्याची आवश्यकता नसते .त्यामुळे अंडं हे मांसाहारी नसून, शाकाहारीच असल्याचा दावा करण्यात आलाय. अंडं हे मांसाहारी की शाकाहारी हा जुनाच वाद आहे. संशोधकांच्या मते, आपण अंडी दररोज खातो, त्यामध्ये गर्भ नसतो. त्यामुळं पक्षी किंवा प्राण्यांची वाढ व्हावी, इतका जीवाचा विकास झालेला नसतो. ज्याप्रकारे गाईचं दूध शाकाहारी असतं त्याचप्रमाणे अंडंही शाकाहारीच असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, आता अंडं हे शाकाहारी असल्याचा दावा केल्याने आम्ही या दाव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला...


व्हायरल पोलखोल
बाजारात मिळणारी बहुतांश अंडी लेयर फार्मवरून आणली जातात. लेअर फार्मवरून आणलेली अंडी शाकाहारी असतात. कारण अंडं देण्यासाठी नरासोबत मिलन होण्याची गरज नसते. कोंबड्याविना कोंबडी अंडी देते ते अंडं शाकाहारी आहे. त्यामुळेच गाईच्या दूधाप्रमाणे लेअर फार्मचं अंडंही शाकाहारी असल्याचा दावा केला जात आहे.  अंड्यामध्ये प्रोटीन असल्यानं ते आरोग्यासाठी उपयुक्त आहे...अंडं हे शाकाहारीच आहे अशी माहिती तज्ज्ञांनी दिलीय.


रिकाम्यापोटी अंडं खावं का?
अनेकांची सकाळ ऑमलेट-पाव किंवा उकडलेल्या अंड्यांच्या नाश्ताने होते. अंडे हे हाय प्रोटीन आणि लो कॅलरी असणारे फूड आहे त्यामुळे दिवसभर एनर्जी मिळते. पण रिकाम्या पोटी अंडं खावं का असा प्रश्न विचारला जातो. एक अंड्यात 80-100 कॅलरी असते, याशिवाय अमीनो अॅसिडही असतं ज्यामुळे शरिराला प्रोटीन मिळतं. रिकाम्या पोटी अंड्याचं सेवन करतो त्यावेळी आपलं मेटाबॉलिजम वाढते आणि पचनक्रिया अधिक तेजीने काम करतं असं तज्ज्ञ सांगतात. अंडे ल्यूटिन और जॅक्सेथिनमुळे डोळ्यांच आरोग्य जपण्यास मदत होते.