मुंबई : आपल्या शरीरातील हाडं मजबूत राहण्यासाठी चांगल्या आहाराची आवशकता असते. याशिवाय मजबूत हाडांसाठी तुमच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणं देखील गरजेचं आहे. कारण हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते. परंतु बऱ्याच लोकांना यासाठी काय खावं आणि काय खाऊ नयेत, याबद्दल माहिती नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत. जे खाल्यामुळे तुम्हाला कधीही बोनमध्ये कॅल्शियमजची कमी जाणवणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाडे मजबूत करण्यासाठी हिरव्या भाज्यांचे मोठे योगदान असते. जर तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश केला, तर तुमची हाडं वेळेआधी कमकुवत होणार नाहीत.


ओमेगा-३ फॅट्सचे सेवन केल्याने देखील तुम्हाला भविष्यात हाडांशी संबंधीत कोणत्याही समस्या आढळणार नाहीत.


हाडे मजबूत करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.


मजबूत हाडांसाठी, तुम्हाला तुमच्या आहारात अधिकाधिक प्रोटीनयुक्त गोष्टींचा समावेश करावा लागेल. खरेतर प्रथिने हे बोन्स तयार करण्यास आणि ती तुटण्यापासून रोखण्यास मदत करतात.