Dry Cough : बदलत्या ऋतूत ड्राई कफचा मोठा त्रास? कोरड्या खोकल्यापासून अशी करा सुटका
Dry Cough Cure: बदलत्या ऋतुत आपल्या आरोग्याच्या समस्या या वाढताना दिसतात. बरेच वेळा सर्दीआणि खोकल्याचा त्रास होतो. आता ऑक्टोबर हिट आणि त्यानंतर हिवाळा ऋतू यामुळे किरकोळ आजार होतच असतात. यात सर्दी आणि खोकला प्रामुख्याने होतो. तर कोरडा खोकला आपल्याला खूप त्रास देतो, अशा स्थितीत दिवसभर सामान्य काम करणे कठीण होते, कफ सिरप काही लोकांना लागू पडत नाही, अशा परिस्थितीत घरगुती उपचार केले जाऊ शकतात.
Dry Cough Home Remedies: देशात सध्या ऋतू झपाट्याने बदलत आहे. दिवाळीसोबत अनेक आजारही दाखल झालेत. यात प्रामुख्याने सर्दी आणि खोकल्याचा समावेश आहे. हिवाळा आणि बदलत्या ऋतूमध्ये संसर्गाचा धोका खूप वाढतो, ज्यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडतो. यापैकी एक आहे, कोरडा खोकला. कोविड-19 नंतर अनेकांना कोरडा खोकला झाला होता. या आजारात कफ तयार होत नाही. मात्र, घशात वेदनाही होतात. हवामानातील या बदलादरम्यान आपण खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोष्टींचे सेवन करुन आराम मिळू शकतो. तुमच्या शरीरात कोरड्या कफाचा हल्ला झाल्यास तुम्ही कोणते घरगुती उपाय करु शकता ते जाणून घ्या.
कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय
जेव्हा आपल्याला कोरडा खोकला येतो, तेव्हा आपण खूप त्रस्त होतो. आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत तुम्ही गरम दुधाची मदत घेऊ शकता. गरम दूध हळूहळू प्यायल्यास कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो. त्यामध्ये काळी मिरी पावडर मिसळल्यास त्याचा परिणाम जास्त होऊ लागतो.
तुळशीची पाने ही कोरड्या कफाचाही शत्रू आहे. या वनस्पतीचे औषधी गुणधर्म आपल्या सर्वांना माहीत आहेत, म्हणूनच आपण आपल्या घराच्या कुंडीत किंवा अंगणात याची लागवड नक्कीच करतो. तुळशीची पाने पाण्यात उकळून प्या.
तुम्ही खूप मध खाल्ले असेल, पण तुम्हाला माहित आहे का की, त्याच्या मदतीने तुम्ही कोरड्या कफपासून सुटका मिळवू शकता. यासाठी लिकोरिस पावडर मधामध्ये चांगली मिसळा, जेवणानंतर या मिश्रणाचे सेवन करा. यामुळे कोरडा खोकला तर दूर होईलच पण पोटाशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळेल.
हिंगाच्या मदतीने तुम्ही कोरड्या कपापासून आराम मिळवू शकता. कारण या सुगंधी मसाल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. सर्वप्रथम आले बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात हिंग टाकून खा.
कोमट पाण्यानेही आराम मिळू शकतो. यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी गरम करून त्यात काळे मीठ टाकून अनेक वेळा गुळण्या करा. कोरड्या खोकल्याची समस्या दूर होण्यास सुरुवात होईल.