Vegetables to be eaten in winter: गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढत आहे. थंडीचा मोसम आणि बदलत्या हवामानामुळे आता खोकला, सर्दी, ताप अशा स्वरुपाचा लोकांना त्रास होत आहे. जर तुम्ही खबरदारी घेतली नाही तर हिवाळा जसजसा वाढत जाईल तसतशा तुमच्या समस्या वाढतील. मात्र, या समस्या वाढू नये म्हणून तुम्ही आहारात काही गोष्टींचा आवर्जुन समावेश केला पाहिजे. हिवाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात, ते जाणून घ्या. ज्या भाज्या हिवाळ्यात खाल्ल्याने  (Remedies for Cold) रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराला अनेक पोषक तत्वांचा पुरवठा होतो.  


थंडीत बीट खा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीट (Beetroot) हे असे एक फळ आहे, ज्याला तिन्ही भाज्या, फळे आणि सॅलड म्हणता येईल. हे पोटॅशियम, सोडियम आणि फायबरसारख्या पोषक तत्वांनी भरलेले आहे. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि वजन संतुलित ठेवण्यासाठी बीट खूप फायदेशीर मानले जाते. अनेकांना ते सॅलड म्हणून खायला आवडते, तर अनेकजण त्याचा रस पितात. तुम्ही कोणतीही पद्धत निवडा, पण हिवाळ्यात बीटचे सेवन अवश्य करा. याचा तुम्हाला फायदा होईल. 


बथुआपासून अनेक फायदे मिळतात


पालकापेक्षा बथुआमध्ये (Bathua) पोटॅशियम आणि लोह जास्त असते. चाकवत असेही म्हटले जाते. यात कमी-कॅलरी, उच्च तंतुमय आणि उच्च प्रथिने असतात. हिवाळ्यात ही भाजी खल्ल्याने हिवाळ्यात खूप फायदे होतात. यापैकी एक म्हणजे बथुआची हिरवी पालेभाजी. ही पालेभाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानली जाते. खरं तर, बथुआ हिरव्या भाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आढळतात. यासोबतच जीवनसत्त्व-ए, बी1, सी यासह 8 प्रकारची जीवनसत्त्वे आढळतात. म्हणूनच, जर तुम्ही थंडीच्या मोसमात बथुआच्या हिरव्या भाज्या खाल्ल्या तर तुम्हाला एकाचवेळी इतके पोषक तत्व मिळतात. 


गाजर खाण्यास द्या प्राधान्य


हिवाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय पदार्थात गाजर महत्वाचे आहे. पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर, लोह आणि व्हिटॅमिन ए यांसारखे पोषक घटक गाजरात आढळतात. गाजर भाजी, कोशिंबीर आणि खीर म्हणून खाल्ले जाते. गाजर खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि रक्ताभिसरण सुरळीत राहते.


लाल आणि हिरवा माठ भाजीत भरपूर पोषक घटक


ज्या लोकांना अ‍ॅनिमियाची समस्या किंवा अ‍ॅनिमिया आहे, त्यांनी हिवाळ्यात लाल आणि हिरवा माठ या पालेभाज्या नक्कीच खाव्यात. या हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियम, प्रथिने, लोह, जीवनसत्व-अ आणि जीवनसत्त्व-ब आढळतात. थंडीत लाल आणि हिरवा माठ  पालेभाज्या खाल्ल्याने तुमचे शरीर उबदार राहते आणि शरीराला अनेक पोषक द्रव्ये मिळतात.


पालक खूप लाभदायक


पालकामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, जीवनसत्त्वे-बी, सी आणि ई व्यतिरिक्त आढळतात. हिवाळ्यात थंडीचा सामना करण्यासाठी पालक हा उत्तम साथीदार मानला जातो. हिवाळ्यात पालक मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. तुम्ही त्याची पालेभाज्याही बनवू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास भुजिया बनवल्यानंतर खाऊ शकता. या दोन्ही प्रकारात तुम्हाला पालकाचे सर्व पोषक तत्व मिळतात. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)