न झोपता माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो? `या` यूट्यूबरने स्विकारलंय आव्हान
Trending News : ऑस्ट्रेलियाचा एक यूटयूबर नॉर्मने झोपेशिवाय राहाण्याच विश्वविक्रम मोडण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हाला माहित आहे का पुरेशी झोप मिळाली नाही तर माणसाच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.
Trending News : ऑस्ट्रेलियाचा एक यूटयूबर नॉर्मने झोपेशिवाय राहाण्याच विश्वविक्रम मोडण्याचा प्रयत्न केला. यात नॉर्मचा भाऊ डॉननेही त्याला विक्रम पूर्ण करण्यासाठी मदत केली. पण हा विश्वविक्रम करणाऱ्या नॉर्मची प्रकृती बिघडत चालली आहे. त्याची शुद्ध हरपतेय, तो नीटपणे बोलूही शकत नाहीए. अशात प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे मनु्ष्य न झोपता किती दिवस जिवंत राहू शकतो. न झोपल्याने माणसाच्या शरीरावर काय परिणाम होतो? नॉर्मचा स्टंट सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. हे आव्हन सोडावं अशी विनंती युजर्सला नॉर्मला करत आहेत.
न झोपता राहण्याचा विक्रम रँडी गार्डनर या वक्तीच्या नावावर आहे. रँडी गार्डनर सलग 264 तास म्हणजे जवळपास 22 दिवस ते जागेच होते. पण यानंतर गार्डनर यांची प्रकृती ढासळली. 264 तासांचा हा विक्रम मोडण्याचं आव्हान नॉर्मने स्विकारलं आहे. पण काही दिवसातच नॉर्मची तब्येत बिघडलीय.
झोप किती गरजेची?
झोप ही माणसाच्या शरीराला आवश्यक आहे. पुरेश्या झोपेमुळे माणसाच्या मेंदू आणि शरीराला विश्रांती मिळेत. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरात हार्मोन्स तयार होतात, जे पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करतात. याशिवाय झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरावर परिणाम होऊ शकतात. यामध्ये थकवा, चिडचिड, लक्ष विचलित होणं, भूक न लागणे, मूड बदलणे, हृदयाच्या समस्या, मधुमेह आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती यांचा समावेश होतो. दीर्घकाळ झोप न घेतल्याने नैराश्य आणि मनोविकृती सारख्या गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात
किती तास झोप गरजेची?
लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य, संपत्ती लाभे अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र ही म्हण प्रत्यक्षात मात्र कधीच उतरत नाही. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी (physically and mentally fit) शांत झोप ही खूप महत्त्वाची आहे. गेल्या काही काळात बदलेली जीवनशैली, कामाचा वाढता ताण, प्रवास (Sleep) यामुळे झोप पूर्ण होत नाही. त्यातच खाण्याच्या बदलेल्या वेळा, जंक फूड याचाही झोपेवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते माणसाला कमीतकमी सात तासांची झोप आवश्यक आहे. कमीत कमी 7 झोप न घेणाऱ्या लोकांमध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढला होता. त्यामुळे 7 तासांपेक्षा जास्त झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप न झाल्यास त्याचा परिणाम चेहऱ्यावरही जाणवतं. शिवाय वजन वाढणं (weight gain), कोलेस्ट्रॉल (Cholesterol), हार्ट अटॅक (Heart attacks), ब्लड प्रेशर आणि डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवू शकतात.