मुंबई : काकडीचे सेवन करणं खूप फायदेशीर आहे. त्यामुळे शरीराला थंडावा तसंच अनेक पोषक तत्वं मिळतात. पण फार कमी लोकांना माहितीये की, काकडी खाल्ल्यानंतर तातडीने पाणी प्यायल्याने नुकसान होऊ शकतं. असं केल्याने अचानक पोटात तीव्र वेदना होण्याची शक्यता असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काकडीनंतर पाणी का पिऊ नये आणि त्यामुळे कोणतं नुकसान होऊ शकते हे जाणून घेऊया. त्याचबरोबर काकडी खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावं याची देखील माहिती देणार आहोत.


काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये?


काकडीमध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचं प्रमाण असतं. त्यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन-सी, कॉपर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे पौष्टिक घटक देखील असतात. काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटातील पाण्याचं प्रमाण वाढतं आणि पोटातील डाइजेस्टिव एसिड पातळ होतं. त्यामुळे अन्न पचणं कठीण होतं. त्याचबरोबर अन्नाचे पचन नीट होत नसल्यामुळे त्याचं पोषणही मिळत नाही.


काकडी खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने होणारं नुकसान


  • काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास अन्नाचं पचन व्यवस्थितरित्या होत नाही आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

  • पोटात जास्त पाणी गेल्याने पोट फुगणं, गॅसची समस्या तसंच पोटदुखी अशा समस्या जाणवतात.

  • शिवाय असं केल्यानंतर तुम्हाला अतिसार किंवा जुलाबाची समस्या होऊ शकते.


काकडी खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावं?


तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, असं कोणतंही फळ किंवा भाजी ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. काकडी खाण्यापूर्वी सुमारे 30 मिनिटे आणि नंतर सुमारे 45 मिनिटं पाणी पिऊ नये.