Kiwi Health Benefits : आपले आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक जण नेहमी प्रयत्नशील असतो. आपल्या आरोग्यासाठी फळ खाण्याचा सल्लाही दिला जातो. तसे पाहता सर्व फळे आरोग्यासाठी चांगली असतात. सकाळच्या नाश्त्यात फळांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. फळे खल्ल्याने दिवसभर ऊर्जा राहते. या फळांमध्ये, किवी (Kiwi) हे देखील एक असे फळ आहे, ज्याच्या सेवनाने आरोग्यासाठी खूप फायदे होतात. किवी हे आरोग्यासाठी वरदान आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किवीची (Kiwi) सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.  कीवी हे चीनचे राष्ट्रीय फळ आहे. किवीमध्ये भरपूर पोषक असतात. त्यात व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, पोटॅशियम आणि अनेक पोषक घटक असतात. किवीचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.  


किवी Heart health साठी चांगले


किवी (Kiwi) फळामध्ये व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहू शकता.


उच्च रक्तदाब (high blood pressure)


जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर किवी खा. त्यात पोटॅशियम पुरेशा प्रमाणात असल्याने त्याचा फायदा होता. ज्यामुळे उच्च रक्तदाब सामान्य ठेवता येतो. उच्च रक्तदाबाची समस्या असलेले लोक त्यांच्या आहारात किवीचा समावेश करु शकतात.


वजन कमी करण्यासाठी उपयुक्त (weight loss)


किवी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. जर तुमचे वजन जास्त वाढले असेल तर किवीचा आहारात समावेश करा. यामध्ये असलेल्या फायबरमुळे तुम्हाला भूक कमी लागेल. ज्यामुळे तुम्ही कमी खाऊ शकाल आणि वजन कमी करण्यास मदत होते.


पचनसंस्था सुधारते (digestion process)


किवीमध्ये पुरेशा प्रमाणात Vitamin आढळते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. चांगल्या पचनासाठी सकाळच्या नाश्त्यात एक किंवा दोन किवी खा. 


कोलेस्टेरॉल (cholesterol)


शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी किवी फळ खाऊ शकता. याच्या सेवनाने वाढणारे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते. किवी हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणारे फळ आहे. 


रोगप्रतिकारक शक्ती मजबूत (immune system)


इम्यून सिस्टम किवीमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही नियमितपणे किवीचे सेवन करू शकता. ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारचे इन्फेक्शन टाळू शकता.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)