Sperm Count Research : सध्याच्या काळात सर्व कामं एका क्लिकवर होत असल्याने मोबाईल फोनचा अतिवापर वाढला आहे. पण यासोबतच याचे दुष्परिणाम देखील तितकेच वाढले आहेत. मोबाईलच्या अतिवापराचा आरोग्यवरही दुष्परिणाम होतोय. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी, टेन्शन, निद्रानाश आणि कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो.  पण आात मोबाईलमुळे आणखी एक धोका उद्भवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरुषांच्या शुक्राणुंवर परिणाम
गेल्या 50 वर्षांत जागतिक स्तरावर पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या (Sperm Count) 50% पेक्षा जास्त कमी झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. शास्त्रज्ञांनी यामागे प्रदूषण आणि मनुष्य वापरत असलेल्या अन्न आणि पाण्यात असलेल्या विषारी घटकांना दिलं आहे. पण आता पुरुषांमधील घटत्या शुक्राणांच्या संख्येमागे आणखी एक कारण असल्याचं म्हटलं जात आहे. हे कारण आहे मोबाईल फोनचा वाढता वापर (Excessive Use of Mobile). नवीन संशोधनानुसार (Research) मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे पुरुषांच्या शरीरातील शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो. 


जिनिव्हा विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात 2005 ते 2018 दरम्यान लष्करी भरती केंद्रांवर 18 ते 22 वर्षे वयोगटातील 2,886  पुरुषांचा डेटा तपासण्यात आला. या अभ्यासात मोबाईल फोनचा अतिवापर आणि शुक्राणूंची गती कमी होणे यांच्यात कोणताही संबंध आढळला नाही. 


पण शुक्राणूंची एकाग्रता आणि संख्या यांच्यातील संभाव्य संबंध समोर आला आहे. जे पुरुष दिवसातून 20 पेक्षा जास्त वेळा त्यांचा फोन वापरतात त्यांच्या शुक्राणूंची एकाग्रता कमी होते (44.5 दशलक्ष प्रति मिलीलीटर), तर जे पुरुष फोन कमी वापरला त्यांच्या शुक्राणूंची एकाग्रता तुलनेने जास्त होती (56.5 दशलक्ष प्रति मिलीलीटर) असं या अभ्यासात आढळून आलं आहे. हा फरक दिवसातून कमी फोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांच्या तुलनेत दिवसातून जास्त फोन वापरकर्त्यांमधल्या शुक्राणूंच्या एकाग्रतेत 21 टक्के घट झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. 


पुरुषांच्या प्रजननक्षमतेमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता हा एक महत्त्वाचा घटक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, जर एखाद्या पुरुषाच्या शुक्राणूंची एकाग्रता 15 दशलक्ष प्रति मिलीलीटरपेक्षा कमी असेल, तर त्याला गर्भधारणेसाठी लागणारे शुक्राणू निर्माण होण्यास एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. जर शुक्राणूंची संख्या 40 दशलक्ष प्रति मिलीलीटरपेक्षा कमी झाली तर गर्भधारणेची शक्यता कमी होते.


जिनिव्हा विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात पुरुष मोबाईल फोन कुठे ठेवतो, याचाही अभ्यास करण्यात आला आहे. काही पुरुषांना मोबाईलफोन पँटच्या पुढच्या खिशात ठेवण्याची सवय असते. पण यामुळे शुक्राणूंवर परिणाम होऊ शकतात अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पण मोबाईलच्या अतिवापरामुळे शुक्राणूंच्या घटत्या संख्येशी कोणतंही ठोस पुरावा सापडलेला नाही. 


केअर फर्टिलिटी ग्रुपचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी प्रोफेसर अ‍ॅलिसन कॅम्पबेल यांनी या विषयावर आपलं मत मांडलं आहे. निरोगी जीवनशैली राखण्यासाठी नियमित व्यायाम, धुम्रपान टाळणं आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादीत करण्याचा सल्ला प्रोफेसर अ‍ॅलिसन कॅम्पबेल यांनी दिला आहे.