Cancer Early Sign : कॅन्सरचं नाव घेतलं तरी भल्याभल्या माणसाला घाम फुटतो. अतिशय धोकादायक आणि जीवघेणा हा रोग माणसाचा शरीराचा खुळखुळा बनतो. कॅन्सरला कुठल्या वयात, कोणाला आणि कसा होतो हे कोणालाही सांगता येतं नाही. विशेष म्हणजे कॅन्सरची लक्षणं दिसत नाही. त्यामुळे आपल्याला या जीवघेण्या आजाराने गाठलं आहे हे सर्वसामान्य व्यक्तीला कळतं नाही. धक्कादायक म्हणजे जोपर्यंत आपण काही आरोग्य समस्येसाठी डॉक्टरांकडे जातो तोपर्यंत उशीर झालेला असतो. म्हणून म्हणतात की, वर्षातून एकदा तरी आपल्या नियमित आरोग्य चाचणी करणं गरजेचं आहे. खास करुन 40 नंतर महिला आणि पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. (health news night sweats sign and symptoms cancer and bone cancer causes in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्करोग हा उपाचर घेऊनही बरा होतं नाही, यात अनेकांचा जीव जातो. त्यामुळे डॉक्टर आणि कर्करोग निदान तज्ज्ञ शरीरात होणाऱ्या सर्व लक्षणांवर आणि संकेतांवर लक्ष ठेवून त्वरित निदान, उपचार घेण्यास सांगतात. कारण वेळेत लक्षणं समजल्यास आणि कर्करोगाचे निदान झाल्यास या जीवघेण्या आजारावर मात करता येते. 


खरं तर या आजाराची लक्षणं ही सर्व सामान्य आजाराच्या लक्षणासारखीच असतात त्यामुळे सर्वसामान्य लोक याकडे दुर्लक्ष करतात. पण आपलं शरीर आपल्याला कायम शरीरात होणाऱ्या बदलाबद्दल इशारा देत असतो. पण त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगलं असतं. कॅन्सरचं एक असंच साधारण लक्षणं आहे जे सहसा लोकांच्या लक्षातही येतं नाही की हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. 


उशी आणि चादरीवर 'या' खुणा दिसतायत का?



नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने कॅन्सरसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार रात्री येणारा घाम हे कॅन्सरचं लक्षणं असू शकतं. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका. उन्हाळ्यात रात्री अनेकांना घाम येतो ही सर्वसाधारण बाब आहे. पण जर झोपताना तुम्हाला खूप घाम येत असेल आणि उशी आणि चादर ओली होत असेल तर हे कर्करोगाचे लक्षण असू शकतं. 


जास्त घाम आणि कर्करोगाचा संबंध 


तुम्ही सकाळी उठल्यानंतर उशी आणि चादरी ओल्या झाल्या आहेत तर याकडे दुर्लक्ष करु नका.  ताबडतोब डॉक्टरांकडे आपल्या आरोग्याची तपासणी करु घ्या. 


कॅन्सरमध्ये जास्त घाम येण्यामागे कारण 


तुम्हाला प्रश्न पडला असेल की कॅन्सर आणि जास्त घाम यांच्या का संबंध आहे. तर शरीरात संसर्ग झाला असल्याने या रुग्णांना जास्त घाम येतो. कारण संसर्ग झाल्यामुळे शरीराचं तापमान वाढलेलं असतं. कॅन्सर हा इम्यून रिस्पॉन्सला ट्रिकर करतो. या परिणाम शरीरात सूज आणणाऱ्या पदार्थांचं प्रमाण वाढून शरीराचे तापमान वाढतं आणि तुम्हाला घाम येतो. अनेक वेळा कॅन्सर रुग्णांवर जेव्हा उपचार सुरु होतो. त्यावेळी या उपचारादरम्यान शरीरात हार्मोन्सच्या पातळीत बदल होतात, त्यामुळेही या रुग्णांना जास्त घाम येतो. 


घाम येणे हे कुठल्या कॅन्सरचं लक्षण?


कॅन्सरचे अनेक प्रकार असतात. त्यामुळे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जास्त घाम येतो म्हणजे कुठला कॅन्सर झाला असेल. तर कॅन्सर रिसर्च यूके यांच्यानुसार रात्री झोपेत तुम्हाला जास्त घाम येतं असेल तर तुम्हाला हाडांचा कॅन्सर झाल्याची भीती आहे. तसं तर हाडांच्या कॅन्सरशिवायही इतर प्रकारच्या कॅन्सरमध्येही घाम येतो. पण जर तुम्हाला झोपेत जास्त घाम येतं आहे, सतत हाड दुखतं आहेत. तर हे हाडांच्या कर्करोगाचे सामान्य लक्षण आहेत. कधी कधी त्या रुग्णांना हलक्या हलक्या वेदनाही असतात. त्या पुढे जाऊन अधिक तीव्र होतात. 


त्वरित डॉक्टरकडे जा!


कॅन्सरसंदर्भात तज्ज्ञ आणि डॉक्टरकडून वारंवार सतर्क राहण्याचे सल्ले दिले जाते. कारण वेळीच निदान झाल्यास या प्राणघात आजारातून रुग्णाना वाचवता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्हालाही जास्त घाम येतं आहे याचा अर्थ तुम्हाला कर्करोग आहे असं नाही. पण रात्रीच्या वेळी जास्त घाम येतोय आणि हाड दुखतंय तर अशा वेळी घाबरुन न जाता डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घ्या. प्रत्येक वेळी ही लक्षणं कर्करोगाचीच असतात असं नाही. त्यामुळे काळजी घ्या पण घाबरु नका. 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)