Belpatra Benefits : अधिक मास सुरु असून खऱ्या अर्थाने 16 ऑगस्टपासून श्रावणाला सुरुवात होणार आहे. भगवान शंकराचा हा आवडता महिना असतो. श्रावणातील चार सोमवारी भगवान शंकराचं आवडतं बेलपत्र अर्पण केलं जातं.  बेलफळापासून अनेक शरीराला अनेक फायदे होतात, असं आयुर्वेदात सांगितलं गेलं आहे.  आता या बेलपत्राने दमा आणि अतिसार या आजारांवर मात करु शकतो असं एका संशोधनातून समोर आलं आहे. (health news scientists discovered treatment for asthma diarrhea with belpatra Benefits in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेलपत्रामध्ये आढळणारे टॅनिन, फ्लेव्होनॉइड्स आणि कौमरिन हे अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरणार आहे, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. शास्त्राज्ञांनुसार बेल फळ, फुल, स्टेम आणि मुळांमध्ये हे घटक आढळतात. 


कानपूर आणि पंजाबमधील शास्त्रज्ञांनी गेल्या चार वर्षांच्या संशोधनानंतर हा निष्कर्ष काढला आहे की, बेलपत्र अस्थमा आणि अतिसाराला नष्ट करु शकतो. कानपूरचे डॉ. सौरभ मिश्रा आणि पंजाबच्या डॉ. शैलजा यांनी इंटरनॅशनल स्कोप इंडेक्सनेमध्ये आपला निष्कर्षाचे पेपर मांडला आहे. 


 डॉ. सौरभ मिश्रा आणि डॉ. शैलजा यांनी देशातील तीन प्रयोगशाळांमध्ये हजारो रिसर्च केल्यानंतर हा अहवाल सादर केला आहे. हे दोन्ही डॉक्टर 2019 पासून पंजाबमधील शुद्ध आयुर्वेद लॅबमध्ये संयुक्तपणे संशोधन करत होते. 


नोएडाच्या बोटॅनिकल गार्डनसह 5 ठिकाणांहून त्यांनी बेलपत्र आणि फळं नमुन्यांसाठी आणले होते. त्याचे टिश्यू कल्चर त्यांनी केल्यानंतर अर्क आणि पावडर तयार करुन त्यावर चाचणी करण्यात आली. या प्रयोगात असं दिसून आलं की, बेलमध्ये टॅनिक, फ्लेव्होनॉइड्स आणि कौमरिन हे मुबलक प्रमाणात उपलद्ब आहे. 


बेलपत्र आरोग्यासाठी फायदेशीर 


टॅनिक दम्यामध्ये प्रभावी काम करतं. 
फ्लेव्होनॉइड्स दमा आणि अतिसारावर प्रभावी ठरतं. 
कौमरिन हे अतिसारावर रामबाय उपाय आहे. 
फ्लेव्होनॉइड्स हे इन्सुलिन पातळी संतुलित करण्यासाठी उपयुक्त ठरतो. 
पॉलिफेनॉल इन्सुलिन पातळी संतुलित करण्यासाठी मदत करतो. 
लिमोनेन केसांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे. 
प्रोलॅक्टिन आईच्या दुधाची गुणवत्ता वाढविण्यास मदत करतो. 


हेसुद्धा वाचा - दारुपेक्षा बदाम यकृताला जास्त हानीकारक! बदामामध्ये कॅन्सर निर्माण करणारे...सद्गुरूंनी दिला इशारा


प्रयोगातील महत्त्वाचे मुद्दे


या दोन्ही डॉक्टरांनी तब्बल 4 वर्षे प्रयोग केले
तर 03 प्रयोगशाळा टिश्यू कल्चर 
10 महिन्यांपासून चाचणी सुरु 
05 ठिकाणच्या बेलफळावर अभ्यास 


बायोटेक्नॉलॉजीचे प्रोफेसर सौरभ मिश्रा या संशोधनाबद्दल असे म्हणाले की, बेलपत्रच नाही तर बेलच्या झाडाच्या प्रत्येक भाग औषधांनी भरलेला आहे. शिवाय तो अनेक आजारांवर रामबाण औषध ठरणार आहे. दरम्यान अलिगढ, नोएडा, पंजाब, कानपूरमध्ये गेल्या 10 महिन्यांपासून पावडर, रस, अर्क या घटकांचं क्लिनिकल चाचण्या सुरु आहे. 


हेसुद्धा वाचा - लांब आणि दाट केस हवे आहेत? खर्चिक Keratin Treatment घरच्या घरी करण्याची सोपी पद्धत


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)