Nagpur News : हृदयविकाराचा (heart attack) झटका ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो त्याचा धोका दिवसागणिक वाढत चालला आहे. हार्ट अटॅकमुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ देखील झाली आहे. ही एक आकस्मिक घटना असून हार्ट अटॅक (Signs of heart attack) कधी येईल ते सांगता येणार नाही. पण तुम्हाला माहित आहे का आता हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही संकेत मिळणार आहे. ते संकेत कसे मिळती याबद्दल जाणून घेऊया... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमध्ये संशोधकांनी हार्ट अटॅकचं (Signs of heart attack) निदान करणारं स्मार्ट वॉच विकसीत केले आहे. मनगटावरचं हे स्मार्ट वॉच तुम्हाला हार्ट अटॅकचा अलार्म देणार आहे. हे स्मार्ट वॉच (smart watch) हार्ट अटॅकचं मुख्य कारण असलेल्या 'ट्रोपोनिन' च्या पातळीची अचूक माहिती देईल. ज्याच्यामुळे हार्ट अटॅक (Signs of heart attack) येण्या अगोदर माहिती मिळेल. भारतातल्या 230 रुग्णांवर या स्मार्ट वॉचची यशस्वी चाचणी पार पडली. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेतही स्मार्ट वॉचचे सादरीकरण करण्यात आले. नागपूरचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शंतनू सेनगुप्ता यांनी हे स्मार्ट वॉच तयार केलं.  



ही आहेत लक्षणे 


उत्तम आरोग्यासाठी हृदय हेल्दी राहणे गरजेचे आहे. हृदयाशी संबंधित समस्या या खूप गंभीर असतात, त्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. हृदयविकार काहीवेळी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे त्या आजाराकडे वेळे लक्ष देणं गरजेचे आहे. जसे की छातीत वेदना होणं, डोकेदुखी हे लक्षणे बऱ्याचदा संभ्रम निर्माण करतात, ही लक्षण गॅसेसळी संबंधित आहे की हृदयविकाराशी  या मध्ये सार्वांचा गोंधळ उडत असतो.  मात्र याशिवाय हार्ट अटॅकची अन्य काही लक्षणे असतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. यामध्ये ज्या लोकांचे वजन जास्त आहे, कुटुंबात हृदयविकाराची पार्श्वभूमी आहे किंवा ज्या लोकांना जास्त वेळ बसून कामे करावे लागतात अशा लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त प्रमाणात असतो. 


या लोकांना सार्वधिक धोका


तुम्ही जर धुम्रपान करत असाल आणि शारिरीक हालचाली होत नसतील तर या आजाराचा धोका अधिक आहे. तसे उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल, मधुमेह, लठ्ठपणा किंवा कुटुंबात हृदयविकाराचा त्रास असल्यास तुम्हाला या आजाराचा धोका जास्त असू शकतो.