मुंबई : Importance Of Vitamins: आपल्या शरीराला दररोज विविध प्रकारच्या पोषक घटकांची आवश्यकता असते. जी सामान्यतः अन्नातून मिळते. शरीरात एकाही पोषक घटकाची कमतरता असल्यास शरीर अशक्त होते आणि अनेकदा थकव्याचा सामना करावा लागतो. भारतातील अनेकांना जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपणही वेळीच सावध व्हायला हवे. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, बरेचसे निरोगी दिसणारे लोक आंतरिकदृष्ट्या कमकुवत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीवनसत्त्वांचे अनेक प्रकार आहेत - A, B, C, D, E आणि K. प्रत्येक पोषक घटकाचे स्वतःचे महत्त्व असते आणि त्याचा शरीराला फायदा होतो. त्यांच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होते, हाडे आकुंचन पावू लागतात, स्नायूंनाही वेदना जाणवू लागतात. अशीही अनेक प्रकरणे आहेत ज्यात त्वचा कोरडी आणि सैल होऊ लागते, तसेच डोक्याचे केस देखील कमकुवत होतात. 


कोणत्या लोकांना अधिक जीवनसत्त्वे आवश्यक आहेत?


कोणतीही व्यक्ती जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा बळी ठरु शकते, तरीही वृद्ध आणि गर्भवती महिलांना याचा जास्त धोका असतो. या आजारात काही औषधे घेतल्यास पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. याशिवाय जर तरुणांनी आरोग्यदायी पदार्थांऐवजी उलटे काहीही खाण्यास सुरुवात केली तर त्यांच्यात जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचीही कमतरता भासते.


जर तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असेल तर त्यावर मात करण्यासाठी मल्टीविटामिन सप्लिमेंट्स घेऊ शकतात. याच्या सेवनाने जीवनसत्त्वांची कमतरता तर दूर होईलच, शिवाय शरीराला क्रोमियम, झिंक, सेलेनियम, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजेही मिळतील.


मल्टीविटामिन खाण्याचे फायदे 


मल्टीविटामिन्स खाल्ल्याने शरीराला प्रचंड ऊर्जा मिळते, यामुळे तुमचे शरीर आणि मज्जासंस्था सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. महामारीच्या काळातही तुमचे संरक्षण आहे. जर तुम्हाला पाय, शरीर आणि हात दुखत असतील तर मल्टीविटामिन तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरु शकतो.


 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)