काळं मीठ खाल्यानं तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
Benefits of Black Salt: आपल्याला कायमच असा प्रश्न पडतो की आपल्या आहारात आपण कोणतं मीठ खायला घेतलं पाहिजे. मीठाचा वापर आहारात कमी करण्याचाही सल्ला आपल्याला एकीकडे दिला जातो. परंतु जर आपल्या जेवणात मीठाचा खडा पडला नाही तर निश्चितच आपल्याला चव ही लागणार नाही.
Benefits of Black Salt: आपल्या शरीराला चांगल्या पोषकतत्त्वांची गरज असते. आपल्या आहारात जर का आपण मिनिरल्सचा वापर वाढवला (Food) तर आपल्यासाठीही तर आरोग्यदायी ठरते. आपल्या जेवणात आपल्या सर्वांनाच काळं मीठ (Black Salt) खाण्याची खूप हौस असते. कारण अनेकदा गुलाबी किंवा काळं मीठ अथवा संदेव मीठ आपल्या आरोग्यासाठी पांढऱ्या मीठापेक्षाही फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. आपल्याला कायमच असा प्रश्न पडतो की आपल्या आहारात आपण कोणतं मीठ खायला घेतलं पाहिजे. मीठाचा वापर आहारात कमी करण्याचाही सल्ला आपल्याला एकीकडे दिला जातो. परंतु जर आपल्या जेवणात मीठाचा खडा पडला नाही तर निश्चितच आपल्याला चव ही लागणार नाही. त्यामुळे आपल्याला काहीएक प्रमाणात यासाठी पर्याय शोधावा लागतो आणि जो आपल्यासाठी फायदेशीरही असेल. (health news what are the benefits of black salt know what is good for your health)
बहुतेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी पांढरं मीठ वापरले जाते. मीठ आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे जे आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. सोडियमयुक्त मीठ (Sodium Salt) खाल्ल्याने गलगंड नावाचा आजार होत नाही. काळे मीठ साध्या पांढऱ्या मीठापेक्षा जास्त प्रभावी आहे. याच्या वापरामुळे पोटाशी संबंधित उलट्या, अॅसिडिटी (Acidity) आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर राहतात. काळ्या मीठामध्ये जीवाणूविरोधी गुणधर्म आढळतात जे शरीराला धोकादायक बॅक्टेरियापासून (Bacteria) वाचवतात.
काळ्या मिठाचे फायदे (What are the Benefits of Black Salt)
1. पोट साफ करतं, वजन कमी करतं -
आजकालच्या वाईट खाण्याच्या सवयींमुळे पोटात बद्धकोष्ठता, अपचन अशा अनेक समस्या दिसून येतात. काळे मीठ लवकर पोट साफ करते आणि बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्यांपासून मुक्ती मिळवते. हे पचनसंस्था सुधारून शरीरातील चरबी (Fats) कमी करण्याचे काम करते. त्यामुळे वजन (Weight Loss) झपाट्याने कमी होते.
हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद
2. भरपूर पोषकत्त्वे असतात -
काळ्या मिठात अनेक प्रकारचे पोषक आणि खनिजे(Minerals) मुबलक प्रमाणात असतात. याच्या रोज सेवनाने हाडांना (Bones) फायदा होतो आणि हाडे मजबूत होतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण काळे मीठ साखरेच्या रुग्णांना (Sugar) जास्त फायदे देते. याच्या सेवनाने साखरेची समस्या (Diebetes) कमी होते.
3. रक्तदाब कमी करण्यास मदत -
खराब जीवनशैलीमुळे लोकांमध्ये रक्तदाबाची समस्या सामान्य झाली आहे. त्यामुळे रक्तदाबात अचानक चढ-उतार झाल्याने जीवघेणा धोका निर्माण होण्याची भीती आहे. काळे मीठ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित करणे सोपे होते. त्यामुळे तुमचा नर्व्हसनेसही कमी होतो.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)